शिवनेरी समूह शेगांव बू छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा उत्साहात साजरा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 फेब्रुवारी) :- युवा तरुणाच्या कल्पनेतून नव्याने स्थापन झालेल्या शिवनेरी समूह शेगाव बु यांच्या वतीने राकेश महाऑनलाईन सेतू सुविधा शेगांव बु येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत , श्रीमतयोगी ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्या कार्यक्रमप्रसंगी शिवनेरी समूहाचे मार्गदर्शक तथा प्रमुख वक्ते प्रा.विजय गाठले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओमेश्वर मोहारे , समूहाचे अध्यक्ष राकेश ईखार, सचिव हर्षल बुटले आणि समूहाचे सर्व सदस्य तथा नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली .

राकेश ईखार यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख वक्ते प्रा. विजय गाठले यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले आणि हर्षल बुटले यांनी उपस्थित यांचे आभार मानले.