✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बू (दि.17 जानेवारी) :- महापुरुषांनी मानव कल्याणासाठी स्वत:चे जीवन खर्ची घातले सावित्रीबाईमुळे आज महिला उच्च पदावर पोहचल्या आहेत . महात्मा फुले डॉ. आंबेडकर , गाडगेबाबा , राष्ट्रसंत असे अनेक महापुरुष व संत यांनी शिक्षणाची प्रेरणा दिली . शिक्षणाशिवाय मानवाची प्रगती होवू शकत नाही . आणि आज स्पर्धेचा काळ असल्याने एमपीएससी यूपीएससी आयएएस सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणे ही काळाची गरज ठरली आहे असे प्रतिपादन शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केले .
येथून किलोमीटर अंतरावर असलेले राळेगाव येथे नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून राळेगाव येथे येथील गुरुदेव सेवा तसेच महिला मंडळ सावित्रीबाई फुले महिला मंडळ सर्व महिला बचतगट जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून अ भा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चिमूर तालुका संघटक सारंग भिमटे अंबुजा सिमेंट फांऊंडेशनचे बाबा लिंगायत आरोग्य सेविका वरोरा पंचायत समिती हे उपस्थित होते
सारंग भिमटे यांनी अंधश्रद्धेमुळे होणारी आर्थिक शारीरिक मानसिक लूट आणि भोंदूंच्या चमत्काराला बळी पडून आपलीच हानी कशी होते हे व्याख्यान तथा चमत्कारांचे प्रत्याक्षिका ( प्रयोग ) द्वारे पटवून दिले तसेच पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला शिक्षणाचे महत्त्व आरोग्य महिला बचत गटासाठी शासनाच्या योजना इत्यादी विषयावर भाषण दिली सोबतच पथनाट्य डान्स मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन थुल मॅडम यांनी पार पाडले