✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.17 मार्च) :- गेल्या दोन दिवसापासून शासकीय निमशासकीय आपल्या जुन्या पेन्शन योजना लागू होण्या करिता संप पुकारून आपल्या हक्का साठी लढा देत आहे यांच्या लढ्यामध्ये अनेक नागरिकांचे नुकसान होत आहे ही बाब जेव्हा शासनाच्या लक्षात येईल तेव्हा यांच्या मागणीला हमखास यश प्राप्त होईल अशी आशा कर्मच्याऱ्या सोबत अनेकांना आहे . विशेष म्हणजे शासनाचे हे कर्मचारी आहे यांनी देखील आपले संपूर्ण तरुणाई जवानी शासनाच्या सेवेत अर्पण केली त्यामुळे वृद्धापकाळात त्यांना मरे पर्यंत शासनाची नोकरी केली त्यामुळे त्याला व त्यांच्या पत्नी कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांना पेन्शन योजना सुरू करावी यासाठी लढा देत आहे ..
यावर शासन काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. परंतु लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री हे लोकांनी आपले अमूल्य मत दान करून आमच्या काही हिताचे करेल अशी आशा व्यक्त करून निवडून दिले .. पण खरे पहाले तर लोक प्रतिनिधी जनसेवे सोबत आपले हित जोपासून आपल्या कुटुंबाचे व स्वतःचे हित अधिक करतो हे शासनाला दिसत नाही का .? असा कोणता लोकप्रतिनिधी आहे का तो बि पि एल यादीत त्यांचे नाव आहे काय ? किंव्हा अंत्योदय यादीत त्याचे नाव आहे. ? किंव्हा तो दुचाकी वाहनचा प्रवास करून जनतेची सेवा करतो काय ? … असेल तर त्यांनी हात वर करावा .. व शासन कडून मिळणारी पेन्शन योजना चा हकदार व्हावा .. संत्री मंत्री आमदार खासदार एक वर्ष देखील कार्यरत राहिला तरी त्यांना मरे पर्यंत पेन्शन लागू होते हा कोणता न्याय ..
एकी कडे पाहाले असता शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याला पेन्शन मिळाले तर हे अनेकाला मान्य होईल कारण त्यांनी आपल्या जवानीचे ३५-४० वर्ष शासनाच्या सेवा करण्यात गमावले .त्याचे ऋण म्हणून शासनाने काहीना काही त्यांना पेन्शन लागू केल्यास किंव्हा दिले तर यात आमचा दूजाभाव नाही उलट आनंद होईल. त्यांना त्याचा अधिकार मिळालाच पाहिजे. यात आमचे देखील सहमत आहे.
परंतु . शेतकरी शेतमजूर यांनी शासनाचे कोणते काय घोडे मारले .. जेणेकरून त्यांनाच पेन्शन लागू नाही. भारतामधे समान नागरिक कायदा लागू आहे . शिवाय सर्वांना समान न्याय मिळतो . व शेतकरी हा देशाचा मुख्य पोशिंदा असे अन्न दाता आहे ..तर शेत मजूर शेतकऱ्याचा मुख्य कना आहे .
अहो रात्र दिवस भर राबराब राबून आपल्या जीवाची पर्वा न करता शिवाय विषारी सापाचा सामना करून वन्य प्राण्यांचा सामना करून देशाच्या नागरिकांसाठी अन्न धान्याची निर्मिती करतो व तेव्हा यांच्या साठी शासनाच्या डायरी मध्ये यांना पेन्शन योजना लागू करण्याची कलम किंव्हा सुविधा नाही का?? थोडा विचार आमचा ही करा शेतकरी शेतमजूर हा देखील आपल्या रोज मजुरी साठी जीव धोक्यात घालून काम करतो शिवाय शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे त्याला आत्महत्या देखील करावी लागते .
परंतु कधी संत्री मंत्री आमदार खासदार शासकीय कर्मचारी यांनी पगार कमी आहे म्हणून मी आत्महत्या केली असे कधी पहाले ? की कधी अशी वार्ता ऐकले नाही ? असे कधीच होणार नाही . असं कधी घडणार देखील नाही .. परंतु शेतकरी शेतमजूर यांच्या जीवनात असे अनेक प्रकार घडताना आपण पाहतो..
तेव्हा खरंच खरी पेन्शन ची गरज कुणाला आहे .??
अहो रात्र काबाड कष्ट करून तटपुंजी कमाई करून आपले कुटुंब सांभाळतो शिवाय अल्पशा कमाईत मला बाळाचे शिक्षण करतो . तसेच कर्जबाजारी होऊन मला मुलीचे लग्न करतो व मरे पर्यंत कष्ट करून या कर्जाची परतफेड करतो .. या गंभीर समस्याचे त्यांची देखील व्यथा लक्षात घेऊन त्यांना देखील ६० वर्षा नंतर त्याचे पोठ सुखाने भरेल अशी पेन्शन लागू करा. किमान १०,००० रू पर्यंत .
मला माहित आहे असे शासन कधीच करणार नाही कारण तुम्हाला पोसनारा अन्न धान्याची निर्मिती करणारा शेतकरी शेतमजूरच आहे याला जर पेन्शन लागू झाली तर आम्हाला कोण पोसनार हा धाक शासनाच्या मनात आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूरला पेन्शन लागू करणारच नाही .
परंतु काबाड कष्ट करून त्यांची देखील हाळे काम करण्याच्या लायकीचे नसतात तेव्हा त्यांना काहीतरी पेन्शन लागू करा की जेणे करून वृद्ध शेतकरी शेतमजूर त्याची वृद्ध पत्नी सुखाने आपले जीवन सुखात जगेल .. या करिता शासनाने यांच्या कडे देखील लक्ष देऊन त्यांना पेन्शन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश बबन विरुटकर यांनी केली आहे.