✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.24 सप्टेंबर) :-
स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी सर्वोदय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या पुण्यतिथी दिनी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून दर वर्षी विधी महाविद्यालयात रक्त तपासणी आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येतो.
या वर्षी देखील स्व. शांताराम जी पोटदुखे यांची पुण्यतिथी आणि राष्ट्रीय सेवा योजना दिवस या दोहोंचा संबंध साधून विधी महाविद्यालयात संस्थेचे सचिव प्रशांत पोटदुखे, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमच्या सुरवातीला स्व. शांताराम जी पोटदुखे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रा. से. यो. विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरात विधी महाविद्यालयातील 35 विद्यार्थ्यानी रक्त दान केले तसेच अनेक विद्यार्थी यांनी रक्तगट तपासणी करून घेतली. शिबिराला. चंद्रपूर ज़िलहां शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या चमुने शिबिरात विद्यार्थी यांच्या रक्त गट तपासणी आणि रक्तदान कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी महत्वपूर्ण सहकार्य दिले. शिबिराला रा. से. यो स्वयंसेवकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून शिबीर यशस्वी केले.
महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी सर्व विद्यार्थी यांना रक्तदान याचे आरोग्य विषयक महत्व विषद केले आणि ज्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचे प्रमाणपत्र प्रदान करून हार्दिक अभिनंदन केले. डॉ. सरोज कुमार दत्ता आणि यांच्या सह सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.