विहरीत उडी घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या 

🔹३ वर्षा आधी वडिलांनी सुद्धा विहरीत उडी मारून केली होती आत्महत्या

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.24 जानेवारी) :- येथून जवळच असलेल्या व भद्रावती तालुक्यातील सांसद ग्राम चंदणखेडा गावात आज अल्पवयिन मुलगा आरोहन माणिक बागेसर याने गावातीलच बाजारवाडी मधील हनुमान मंदिर जवळील सार्वजनिक विहारित उडी मारून जीवन यात्रा संपवली. 

सविस्तर माहिती अशी कि आरोहन हा घरातून बुधवार दि. २२ ला सायंकाळी ६ च्या सुमारास घरून निघून गेला. घरून निघून गेल्या कारणांनी मोठा भाऊ व आई यांनी सर्वत्र त्याची शोधाशोध केली. पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.

दरम्यान २ दिवसा नंतर आज दि. २४ डिसेंबर ला गावातीलच विहरीत त्याचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावातील काही मुलांना दिसून आला. ही बातमी गावात पसरताच गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बगण्यासाठी गर्दी केली होती. त्या नंतर भद्रावती पोलीस यांना याची सूचना मिळाल्या नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या नंतर पंचनामा लिहल्या नंतर मृत्यूदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला व उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथे पाठवण्यात आला आहे. 

३ वर्षा आधी आरोहन च्या वडिलांनी सुद्धा कर्ज बाजारी पणामुळे अशीच विहरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली होती. तेव्हा पासून एकट्या आई च्या भरोशावर सम्पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली होती. आई मोलमजुरी करून यांचे पालनपोषण करीत होती. आरोहन च्या अशा एकाकी घेतलेल्या टोकाच्या पावलांमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे.