✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)
महागाव (दि.22 मार्च) :-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा संघटक सचिन पाटील उबाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांचे सचिव नितीन लालसरे यांची भेट घेतली व यवतमाळ जिल्ह्यातील गारपीट व वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पाऊस व गारपिटीने शेत पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की दि 18 मार्च व 19 मार्च रोजी दोन ते तीन दिवस यवतमाळ जिल्ह्यातील महागाव उमरखेड येथे अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात हरभरा गहू व इतर पिकाचे नुकसान झाले तरीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी नाफेड मार्फत हरभरा खरेदी लवकर सुरू करण्यात यावी यवतमाळ जिल्ह्यातील पांदण रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे तालुक्यातील पांदण रस्त्यासाठी अनेक शेतकरी उपोषणाचा मार्ग पत्करत आहे.
परंतु त्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसून पांदण रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी राहुल शिरपूली शिरमाळ परिसरात वाघाच्या हल्यामध्ये अनेक शेतकऱ्याची जनावरे दगावली असून संबंधित शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच या प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा कुसुम सौर ऊर्जा योजनेअंतर्गत मांगेल त्याला सौर कृषी पंप देण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे जिल्हा संघटक सचिन उबाळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांचे सचिव नितीन लालसरे यांना दिले.