विरोधी पक्ष नेते विजय भाऊ वडेट्टीवार, चिमूर क्रांती भूमीत शहिदांना नतमस्तक झाले

✒️शुभम गजभिये चिमूर (Chimur प्रतिनिधी)

चिमूर(दि.17 ऑगस्ट) :- 

स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने स्वातंत्र्याची ठिगणी पेटली व क्रांतीकारांच्या बळकट मनसुब्याने. सर्वप्रथम चिमूर स्वातंत्र झाले.सन १९४२ च्या क्रांतीत युवा क्रांतीकाऱ्यांनी आपला प्राणाची आहुती दिली.या रक्तरंजित क्रांतीचा इतिहास अजरामर असून देशाच्या लोकशाहीवर घाला घालून संविधान नष्ट करू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून हद्दपार करण्यासाठी क्रांतीभूमीत दुसऱ्यांदा बदलाची क्रांती घडवा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. क्रांतीभूमी चिमूर येथे शहीदांना श्रध्दांजली देण्यासाठी आले .,काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते .

 याप्रसंगी उपस्थित अविनाश भाऊ वारजुकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सतिश भाऊ वारजुकर समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र ,धनराज भाऊ मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग,दिगंबर जी गुरपूड,गजानन भाऊ बुटके माजी जिल्हा परिषद सदस्य , राम राऊत सर सेवादल काँग्रेस कमिटी संजय डोंगरे माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, प्रफुल भाऊ खापर्डे जिल्हाध्यक्ष अनु. काँग्रेस कमिटी चंद्रपूर, विजय गावंडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, प्रमोद चौधरी अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी नगभिड, स्वप्निल भाऊ गावडे नगराध्यक्ष नगरपंचायत सिदेवाही, विनोद भाऊ ढाकूरकर माजी नगरसेवक.संदीप कावरे माजी अध्यक्ष युवक काँग्रेस विधानसभा चिमूर .कृष्णाजी तपासे ज्येष्ठ नेते काँग्रेस,राजूभाऊ लोणारे जिल्हा सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी, माधव बाबू बिरजे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर प्रदीप भाऊ तळवेकर अध्यक्ष चिमूर ओबीसी काँग्रेस तथा पर्यावरण विभाग , नागेश भाऊ चट्टे अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी चिमूर, गौतम भाऊ पाटील महासचिव जिल्हा युवक काँग्रेस कमिटी,उमेश हिंगे नगरसेवक , विलास मोहीनकर युवक कॉंग्रेस कार्यकर्ते शुभम गजभिये पळसगांव अमित मेश्राम निखिल डोईजड उपसरपंच सावरी बिड भावना पिसे गिता रानडे प्रिती दिडमुठे उपसरपंच साठगांव महिला उपस्थित होते, तसेच विधानसभेतील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.