विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.18 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारगाव खुर्द येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

     येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गुणवंत देहारकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्याने वाढ दिवसावर बेवारस विनाकारण खर्च करून वाढ दिवस साजरा करण्या पेक्षा विद्यार्थ्या सोबत साजरा करण्यात अधिक आनंद मिळत असतो करिता येथील युवा सामजिक कार्यकर्ते श्री गुणवंत देहारकर यांनी आपला वाढ दिवस विद्यार्थ्या सोबत त्यांना पेन, नोट बुक, चॉकलेट देऊन साजरा केला शिवाय शालेय परिसरात दिर्घाउशी वृक्षाची लागवड करून वृक्षारोपण देखील करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री केशवराव मिलमिले , शिक्षक डंभारे , पिसे मॅडम , तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजीत पावडे, विलासराव कष्टी , राजूभाऊ गोडघाटे, सृष्टी नागेकर, अरविंद मोरे , गणेश नागेकर , व तसेच सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .