🔸विद्यार्थ्यांना पुराचा धोका
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.24 जुलै) :- वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव मुठीत घेउन तुंब पाण्याने भरलेला पुलावरून घरी जाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आपल सरकार मोठ मोठया योजना काढत आहे पण ग्रामीण भागतील शालेय विद्यार्थी साठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही कधी बस वेळेवर नाही तर वसतिगृह सुद्धा कमी आहे.
कोसरसार ते बोडखा मार्गावर एक खूप वर्षापूर्वीचा पुल आहे या पुलावरून 25 वर्षांपासून बोडखा ग्रामस्थ जाणे येणे करतात पण मुसळधार पावसाने दोन तासात पाण्याची पातळी वाढून पुलावरून पाणी वाहू लागते बोडखा मोकाशी गावाला जाण्या येण्यासाठी एकच मार्ग आहे. शालेय विद्यार्थी कोसरसार व वरोरा शाळे मध्ये शिक्षण घेत असुन विद्यार्थीला गावाला जाण्यासाठी जिव मुठीत धरून पाण्याच्या प्रवाहा मध्ये जावे लागते.
जर कोणत्या विद्यार्थीला पुल ओलांडताना काही कमी जास्त झाले तर प्रशासन जबाबदारी घेणार काय? वारंवार प्रशासनला, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाला माहिती देऊन सुद्धा पुलाचे बांधकाम, नाल्याचे खोलीकरण, रोडचे बांधकाम अजून सुद्धा झाले नाही. शालेय विद्यार्थी चे सामान्य पालक यांनी कुणाकडे मदत मागायची फक्त शहराचा विकास,गावाचा समस्या कधी मार्गी लागणार अशी ग्रामीण भागातील जनतेच मत आहे. सरकार नि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडवावे.