✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.3 जुलै) :- वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातील युवा नेतृत्व करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवा झुंझार नेतृत्व करणारे श्री किशोर दादा टोगे मित्रपरिवार व शारदा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या १० वी १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या मुख्य हेतूने विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम वरोरा येथील नगर भवन येथे मोठ्या उत्साहाने पार पडला .
विद्यार्थ्याच्या यशा मागे त्यांच्या पालकांचा आई वडिलांचं मोठा सहभाग असतो मुलाचे भविष्य घडविण्यात पालक जीवाचे रान करून मुलांना घडवण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु आज च्या स्पर्धेच्या युगात अनेक हुशार विद्यार्थी पैशा अभावी , परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थी हवे त्या यशाची पायरी गाठू शकत नाही . पालक देखील पैसा परिस्थिती अभावी हवे ते शिक्षण देऊ शकत नाही .
परंतु अनेक परिस्थिती चा कठोर सामना करून पालकांनी आपल्या मुलाचे भविष्य लक्षात घेऊन मुलांना ज्या शिक्षणात आवड आहे त्या शिक्षणात कसलीही कसर करू नये त्या करिता आपल्या जीवाचे रान होईल तरी चालेले. कारण आजचे रान उद्या तुमच्या मुलाचे उज्वल भवितव्य घडविणारं आहे हे लक्षात घ्यावे .
असे मत यावेळी किशोर दादा टोंगे यांनी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसमोर व्यक्त केले . तसेच ते समोर बोलले की विद्यार्थ्यांना काही शैशनिक अडी अडचणी आल्यास मला प्रत्यक्ष भेटावे मी विद्यार्थ्याच्या सदैव पाठीशी आहे असे देखील ते म्हणाले ..
विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री वामनराव चटप, माजी आमदार अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन समिती. हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान. श्री . आयुष नोपानी साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा , मा.श्री . ना.गो. थुटे ज्येष्ठ साहित्यिक व इतर मान्यवर मार्गदर्शक व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री किशोर दादा टोगे यांनी केले होते .
१० वी १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ , सन्मानपत्र , सन्मान चिन्ह , व भेट वस्तू देऊन सत्कार करून सन्मानित करून त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या…विद्यार्थ्यांना दिलासा प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमाला सार्वत्रिक कौतुक केले जात असून गाव खेड्यात चर्चेचा विषय बनला आहे.