विदर्भस्तरीय भटक्या विमुक्तांची संवाद बैठक बोलवा

🔹शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

✒️संतोष लांडे नागपूर (Nagpur प्रतिनिधी)

नागपूर(दि .20 ऑगस्ट) :- ओबीसीचा घटक असलेल्या भटक्या विमुक्तांच्या समस्यांकडे राजकीय पक्षांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे त्यामुळे भटक्या विमुक्तांचे प्रश्न सुटत नाहीत. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी विदर्भस्तरीय संवाद बैठक आयोजित करावी अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

ओबीसीचा घटक असलेल्या व प्रत्येक आंदोलनात पुढे असलेल्या भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी व विरोधक दोघांचेही दुर्लक्ष आहे.

प्रश्नच समजत नसल्याने न्याय सुध्दा मिळत नाही. विदर्भातील भटक्या विमुक्तांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पक्षविरहीत एक दिवसीय संवाद बैठक आयोजित करण्यात यावी. या बैठकीत भटक्या विमुक्त प्रवर्गातील धनगर बंजारा वंजारी या जातीला शासनाकडून फायदा होत आहे त्यांनाच निधी दिला जातो तो सुविधा दिला जात आहे बाकी इतर जातीचं काय त्यामुळे इतर विमुक्त भटक्यांची जनगणना झाली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण क्रिमिनल ची ज्याचा कट रद्द करा जेवढी लोकसंख्या तेवढी निधी द्या मच्छीमारांचे प्रश्न सोडवा असे अनेक प्रश्न विमुक्त भटक्या जमाती मधील आहे .

त्यामधील जाती बेलदार, लोहार, ढिवर, नाथजोगी, पांगुळ, भाट यांच्यासह सर्व जातींच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून चर्चा करण्यात यावी व भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी रोडमॅप तयार करावा अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस श्री राजेंद्र बढिये यांनी खा. शरद पवार यांच्याकडे केली. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल तसेच भटक्या विमुक्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. शरद पवार यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

यावेळी माजी गृहमंत्री व आमदार श्री अनील देशमुख, माजी मंत्री श्री रमेशचंद्र बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य श्री सलीलदादा देशमुख उपस्थित होते.