वित्तीय साक्षरता अभियान अंतर्गत भारतीय रिझर्व बँक,नागपुर कडून वृक्षारोपण

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3 ऑगस्ट) :- भारतीय रिझर्व बँक द्वारा सामाजिक दायित्व जपत वरोरा तालुक्यातील कांचनी शेतकरी उत्पादक कंपनी, चिनोरा मध्ये वित्तीय साक्षरता अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

भारतीय रिझर्व बँक स्थापनेच्या 90 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने सदर बँकेने सामाजिक दायित्वापोटी पूर्वविदर्भात नऊ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्याचे लक्षांक ठेवले असून त्या उपक्रमाचा पहिला टप्पा कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड वरोरा येथे 125 वृक्ष लागवड करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.

सदर कार्यक्रमात भारतीय रिझर्व बँकचे सहा. व्यवस्थापक पंकज करमणकर व अधिकारी सर्वेश सर उपस्थित झाले होते, त्यांनी वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत ई- इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर आर्थिक उलाढालित करताना होणारी फसवणूक कशी टाळता येईल याबाबतीत उपस्थित शेतकरी प्रतिनिधी यांना सविस्तर माहिती दिली.

एटीएम च्या वापरण्यात व नेट बँकिंग द्वारे होणारी फसगत आपल्या अज्ञानाने कशी होते हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नोडल अधिकारी विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट नागपूरच्या प्रमुख श्रीमती प्रज्ञा गोडघाटे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट चे नोडल अधिकारी नंदकुमार घोडमारे यांनी केले. या कार्यक्रमात मूल्य साखळी तज्ञ गणेश मादेवार, सामाजिक विकास तज्ञ आशिष दुधे, शेगाव मंडळ कृषी अधिकारी विजय काळे.

कृषी पर्यवेक्षक प्रफ्फुल आडकीने तसेच कांचनी एफ पी सी चे संचालक यशवंत सायरे, हिरालाल बघेले, बळीराम डोंगरकर, नितीन टोंगे हे उपस्थित होते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी धोबे यांच्या नेतृत्वात कंपनीचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. कांचनीने त्यांच्या परिसरात 400 विविध वृक्षांची लागवड केलेली आहे.