✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती ( दि. 23 एप्रिल ) :-
भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे २२एप्रिल शनिवार ला.नेहरु विद्यालय चंदनखेडा येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले होते. इयत्ता १० वी १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार तथा विविध शैक्षणिक क्षेत्रातील शासकीय योजनांची माहिती शिष्यवृत्ती संबंधित माहिती आणि स्वतःचे ध्येय निश्चित कसे करावे या विषयाला अनुसरून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर जांभुळे (माजी जिल्हाध्यक्ष आदिवासी माना जमात विध्यार्थी संघटना चंद्रपूर) मार्गदर्शन निलेश नन्नावरे (नेचर फाउंडेशन नागपूर) विविध शैक्षणिक क्षेत्रातील शासकीय योजनांची माहिती शिष्यवृत्ती संबंधित योजना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले.
संदिप रामटेके (बार्टि समतादुत भद्रावती) यांनी सुद्धा सखोल अशी बार्टी, व समाज कल्याण योजनांची माहिती,व व्यसनमुक्तीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी गावातील युवा वर्ग विध्यार्थी विध्यार्थीनी ,पालक, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष, ठावरी,पाटोळे, झाडे,भोयर,सदस्य उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता शौर्य क्रिडा मंडळाचे शुभम भोस्कर, देवानंद पांढरे, राहुल कोसुरकार,भुपेश निमजे, अविनाश नन्नावरे, कुणाल ढोक, शंकर दडमल, मंगेश हनवते, विरांगणा मुक्ताई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश केदार,यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश लोणकर सर यांनी केले.संचालन समतादूत गणेश हनवते यांनी केले तर आभार आशिष हनवते यांनी मानले.