विघ्नहर्ता गणेश मंडळ तर्फे सिकालसेल, रक्तदाब व मधुमेह ची तपासणी

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.15 सप्टेंबर) : – सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून वरोरा येथील गाडगे नगर मधील विघ्नहर्ता गणेश मंडळा च्या वतीने मोफत सिकालसेल, रक्तदाब, मधुमेह ची तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. या तपासणीसाठी शेकडो लोकांनी प्रतिसाद दिला. 

       यामध्ये शिकालसेल, मधुमेह, रक्तदाब, शुगर तपासणी शिबीरा मध्ये वरोरा शहरातील ११५ रुग्णांनी या शिबिरत तपासणी करून घेतली. या शिबिरात तपासणीसाठी वरोरा येथील शासकीय वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रतिक दारुंडे, अधीपरिचारिका किरण धांडे, समुपदेशक नेहा इंदूरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तनिष्का खडसाने, पूनम धांदे उपस्थित होते. यावेळी त्यांचे मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

       याप्रसंगी डॉ. दारुंडे यांनी आपल्या रक्तदाबाची नियमित तपासणी करून घ्या नियमित व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अभिभाज्य घटक बनवा असे उपस्थित रुग्णांना सामोधित केले.

       या शिबिराच्या यशस्वितेसाठी गजु पंधरे, आदित्य पडोळे, राकेश पंधरे, निखिल लोहकरे, पराग मालवीय, मयूर पिंपळकर, रोहन धोपटे प्रीतम थूल, समीर मेश्राम, हर्षल बाकडे, केतन बाकडे, पीयूष पेंदाम, प्रथम हरणे, कृष्णा मत्ते, गोलू येलके, सौरभ मोरे, प्रज्वल ढवस उपस्थित होते.