✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.5 मार्च) :- राजुरा विधानसभा क्षेत्रात भरपूर समस्या आहेत.विकासापासून वंचित असलेल्या या क्षेत्राच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.गोंडपिपरी या क्षेत्रातील मागास तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
गोंडपिपरी येथील कन्यका सभागृहात गोंडपिपरी भाजपाच्या वतीने ना.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर माजी आमदार सुदर्शन निमकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार संजय धोटे,महिला जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम,बबन निकोडे,अमर बोडलावार,सुहास माडूरवार,नामदेव डाहूले,दिपक बोनगीरवार,दिपक सातपूते,चेतनसिहं गौर,साईनाथ माष्टे,नगरसेविका मनिषा दुर्याेधन,मनीषा मडावी,अश्वीनी तोडासे,अरूणा जांभुळकर,कोमल फरकडे,रेणूका येल्लेवार,गणपती चौधरी,संदीप पौरकार,निलेश पुलगमकर आदिंची उपस्थिती होती.गोंडपिपरी नगराच्या सर्वागिण विकासासाठी आपण याआधी विस कोटी रूपयाचा निधी दिला असल्याची आठवण यावेळी मुनगंटीवार यांनी करून दिली.
राजुरा विधानसभा क्षेत्रासह गोंडपिपरी तालुका व नगराचा चौफेर विकास हा माझा ध्येय आहे.चंद्रपूरवरून अहेरी व सिरोंचाकडे जाण्याकरिता गोंडपिपरी महत्वाचे केंद्रबिंदू ठरते.यामुळे येथे भव्य बसस्थानकाची निर्मीती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.गोंडपिपरी तालुक्यात तिन मोठया नदया वाहतात.पण सिंचनाअभावी नदयांच्या पाण्याचा फायदा शेतकरी बांधंवाना होत नाही.
तालुक्यातील शेतकरी बांधंवाना दिलासा देण्यासाठी या नदयातील पाण्याच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था करण्याकरीता पुढाकार घेणार असल्याचे सांगत धाबा येथील श्री संत कोडया महाराज देवस्थानच्या परिपुर्ण विकासासाठी कटीबध्द असल्याचे मुनगंटीवार यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.गोंडपिपरी नगरात सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा केला.यावेळी त्यांचे स्वागत करित नगरातून रॅली काढण्यात आली.यानंतर कन्यका मंदीरात सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा पार पडला.कार्यकर्ता मेळाव्यातून अनेक गावातील संरपंचानी गावातील समस्या सोडविण्यासंदर्भात ना.सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.
सदर कार्यक्रमात कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात महत्वाची भुमिका बजावणारे आरोग्य सेवक देवपाल मेश्राम यांचा देखील ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला गोंडपिपरी तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व अनेक गावातील सरपंच मंडळी उपस्थित होती.