वारी प्रबोधनाची राष्ट्रसंतांच्या विचाराची दिंडीचे चारगाव नगरीत भव्य स्वागत 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.13 सप्टेंबर) :- स्थानिक चारगाव बू येथे आज गुरुकुंज मोझरी येथील वारी प्रबोधनाची राष्ट्रसंतांच्या विचाराची या भव्य ऱ्यालीचे आगमन झाले तेव्हा गावातील नागरिकांनी तसेच गुरुदेव प्रेमी भक्तांनी त्यांचे स्वागत केले .

तर येथील भजन महिला मंडळ येथील गुरुदेव प्रेमी महिला सौ मीनाक्षी नाकाडे यांनी स्वागत गीत गाऊन सर्व पाहुणे यांना मंत्रमुग्ध केले…या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शक म्हणून . मा. श्री . नरेंद्र जीवतोडे ग्रामगीता तसेच सामुदायिक प्रार्थना करिता गावकऱ्यांनी तसेच बालगोपलनी एकवटले पाहिजे कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार च मानवाला बदलवू शकतो. व्यसन माणसाचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकते तेव्हा ग्रामगीता चे वाचन करणे गरजेचे आहे तसेच सामुदायिक प्रार्थना यांचा आदर करा.असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

गुरुदेव सेवा मंडळ गुरूकुंज मोझरी चे संचालक श्री रविदादा मानव मुलांना वकील डॉक्टर करण्या पेक्षा आधी त्याला माणूस करा. त्याला चांगले संस्कार द्या कारण आपले संस्कार चुकले तर त्याचे भविष्य अंधारमय होऊ शकते . तेव्हा शिक्षण घेत असताना त्यांच्यावर एक करडी नजर देखील असू द्या. कारण आपला मुलगा गल्लीच मुलाच्या संगतीला लागू देऊ नका. मुलगा झाला तर आई वडिलांना मोठा आनंद होतो व सर्व गावात पेढे वाटून आनंद व्यक्त करतो तोच मुलगा मोठा होऊन जर गलिच्छ मुलाच्या संगतीला लागून जर तो गुंड प्रवृत्तीत प्रवेश केला.

तर त्याची संपूर्ण संपूर्ण आयुष्य मातीमोल होती तेव्हा सर्वप्रथम आपल्या मुलांना उच्च शिक्षणासोबत सुसभ्य व्यक्तींचा सहवास देखील महत्त्वाचा असतो त्याकरिता सकाळ सायंकाळ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराच्या आदराच्या ग्रामगीता या ग्रंथाचे पठण नमन करून त्याचा अभ्यास करणे आजच्या पिढीला अधिक महत्त्वाचा आहे जर तो चांगला माणूस बनेल तर तो समोरची पिढी ही मानवत बनेल हे लक्षात ठेवा करिता सर्व माय बहिणींनी तसेच सर्व नागरिकांनी आपल्या नवयुवक मुलाकडे अधिक लक्ष देऊन त्यांना सुसंस्कार द्या अशी प्रतिपादन अशी मत यावेळी चारगाव वासियांसमोर गुरुकुंज मोझरी येथील श्री रवी दादा मानव यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला अनेक मान्यवर तसेच मार्गदर्शक श्री राजू घुमणार गुरुदेव मंडळ प्रचारक , डॉ . शालिक झाडे , श्री माणिक डुकरे , गजानन घुमणार , श्री प्रकाश कष्टी , गावचे सरपंच श्री योगीराज वायदुळे , श्री राजू थूल पो.पा., नानाजी महाराज देवस्थान चे सचिव श्री शरद भोगेकार , श्री महेश शास्त्रकार अध्यक्ष , तसेच प्रा .विजय गाठले , व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री विठ्ठल तुरानकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अविनाश डाहुले व गावकऱ्यांनी तसेच गुरुदेव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी फार मोठे मोलाचे सहकार्य केले.