वायगाव (तु) येथे मस्कऱ्या गणपतीचे थाटात आगमण 

🔸समाजपयोगी विविध उपक्रम राबणार 

✒️मनोहर खिरटकर (खांबाडा प्रतिनिधि)

खांबाडा (दि.24 सप्टेंबर) :- भद्रावती तालुक्यातील मिनी बाजारपेठ असलेल्या शेगाव येथुन नजीक असलेल्या वायगाव (तु) येथे मस्कऱ्या गणपती कालात समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जात असल्याचे प्रख्यात असल्यानं गावातील तसेच परिसरातील अनेक भाविक भक्त विसर्जनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने येत असतात .

 संकष्ट चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर मस्कर्या गणपतीचे प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली . विशेष म्हणजे ढोल ताशांच्या गजरात तसेच dj साऊंड च्या आवाजात वायगाव नगरीचे युवक मोठ्या उत्साहाने नाचत गाजत बाप्पाची गावात भव्य मिरवणूक काढून रात्री दहा वाजता मसकऱ्या गणपती चें विधीवत पूजा अर्चना करून आरती करून प्रतिष्ठापना करण्यात आली . 

यावेळी गावातील अनेक गणेश भक्तानी सहभाग घेतला व गावात अनेक मस्काऱ्या सार्वजनिक गणेश मंडळात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली..पण सिध्दिविनायक मस्कर्या गणेश मंडल दरवर्षी समाजपयोगी विविध उपक्रम राबवले जाते त्यात याहि वर्षात भविष्यात होणारी भिषण पाणी टंचाई यावर उपाय म्हणून वाहुन जाणारे सांडपाण्यापासुन पिण्यायोग्य पाणी बनविणे व वापरात आणने याचे बोलके प्रात्याक्षिक देखावा गणेश मंडपात बनविण्यात आला शिवाय गणेशभक्तासाठी भक्ती स्वराजंलीचाहि कार्यक्रम दिनाकं २९/९/२०२४ ला सायंकाली ठेवण्यात आला तथा भव्य मिरवणूक काही विपरीत परिणाम होनार नाही या करिता चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे मंडलाचे पदधिकारी मनोज पोहिनकर यांनी सांगीतले.