वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

🔸खानगाव येथील घटना

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.15 मे) :- 

स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व चिमूर तालुक्यात येत असलेल्या खानगाव येथे आज वाघाने युवकाने ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर असे की येथील युवक मृतक अंकुश श्रावण खोब्रागडे वय 34 वर्ष या युवकाला वाघाने ठार केल्याची घटना घडली. मृतक युवक अंकुश हा आपल्या शेतामध्ये दररोज आपल्या आहेत.

मालाची तसेच जनावराची देखभाल करण्यासाठी रात्रीला झोपण्यास जात होता कल रात्री देखील हररोज प्रमाणे जेवण करून झोपण्यासाठी स्वतःच्या शेतात गेला होता एक झोप झाल्या नंतर रात्री ला सोचालय करिता शेती लगत असलेल्या नदी पाट येथे सोचालय करीत असता दडी मारलेल्या वाघाने अचानक अंकुश हल्ला बोल करून अंकुश ला जागीच ठार केले व पूर्णतः आपली भूक भागवली . सकाळी सात वाजले तरी देखील अंकुश घरी परतला नसल्याने त्यांचे भाऊ शेतात गेले तेव्हा झोपडीत त्याची चप्पल व मोबाईल बाहेरच पडून दिसला तेव्हा याचा शोध घेतला असता. त्याचा मृतदेह नदी पाटात दिसला तेव्हा त्याच्या खालची जमीन सरकली.

तेव्हा आरडा ओरड करून परिसरातील लोकांना गोळा केले . याची माहिती स्थनील पोलीस स्टेशन शेगाव येथे कळविण्यात आली तेव्हा येथील ठाणेदार योगेंदरसिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली पुढील पंचनामा करीत होते याचं सोबत वनविभागाचे कर्मचारी देखील दाखल होऊन अधिक पंचनामा करीत होते . वृत लीहे पर्यंत पुढील तपास वन विभाग तसेच पोलीस प्रशासन अधिक तपास करीत होते.