वाघाच्या हल्यात शेतकरी ठार

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)  

चंद्रपूर(दि.24 जुलै) :- नागभीड तालुक्यात येत असलेल्या मिंडाळा  गावातील शेत शिवारात वाघाने शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर मागेहुन हल्ला करून ठार केल्याची  घटना मंगळवारला सांयकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. दोडकुजी झिंगर शेंद्रे (६० ) रा.मिंडाळा असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

मृतक शेतकऱ्याची शेती ही मिंडाळा -कोसंबी या रोडवर जंगलाला लागुन आहे.तो नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करीत असतांनाच वाघाने त्याचे वर मागेहुन हल्ला करून त्याचा नरडीचा घोट घेतला .त्या शेतकऱ्याचे शरीराचे काही भाग फस्त केला आहे.काही वेळ वाघ मृतक शेतकऱ्या जवळच होता. या घटनेची माहिती होताच गावातील नागरिकांनी त्यांच्या शेतात कडे धाव घेत आरडा-ओरड केली.तेव्हा तेथुन वाघाने पळ काढला.

या घटनेची माहिती नागभीड प्रादेशिक वन विभागाला देण्यात आली.लगेच येथिल कर्मचारी घटनास्थळावर पोहचले व घटनेचा पंचनामा केला.शेतातुन  शव बाहेर काढण्यात आले.मृतकाला पत्नी,एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.या घटने मुळे वनाला लागुन असलेल्या शेताच्या शेतकऱ्यांन मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.