🔹सावली तालुक्यातील सिर्शी येथील घटना
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.21 ऑगस्ट) :-
सावली वनपरिक्षेत्रांतर्गत सिरसी बीटातील कक्ष क्रमांक 196येथे दररोज प्रमाणे आपली गुरे चरायला गेलेल्या गुराखी दिवाकर नथुजी आवळे रा. सिर्सी या व्यक्ती वर अचानकपणे दबा धरून बसलेल्या वाघाने हमला करून जागीच ठार केल्याची घटना आज दुपार दोन वाजता च्या सुमारास घडली.
जंगल व्याप्त शेतशिवारात गुरे चारत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले वरील घटना वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना माहीत होताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली यावेळी उपवन परिक्षेत्र अधिकारी राजू कोडापे,बीट वनरक्षक महादेव मुंडे, वनरक्षक सोनेकर, वनरक्षक आखाडे व वन कर्मचारी उपस्थित होते.
वरील घटना माहीत होताच परिसरात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमास बघण्याकरिता एकच गर्दी उमटलेली होती महिनाभरात अनेक घटना तालुक्यात झालेल्या असून सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे यातच मजुरांना वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याची वारंवार वन विभागांनी सूचना देऊन सूचनेचे पालन होत नसल्याने अनेक घटना घडत असल्याचेही नाकारता येत नाही .
वन विभागाने नेहमी सतरता बाळगण्याचे आव्हान जनतेला करीत असून सदर घटनेने आम जनतेत चांगलीच भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.