वर्धा नदी पात्रात बडून चंद्रपूरच्या मुलाचा मृत्यू

🔸हडस्ति ते कढोली पुला दरम्यान घटना

 

🔹 नदी पात्रात पोहण्याचा प्रसंग अंगलट आला

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.1 जानेवारी) :- बल्लारपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वर्धा नदीवर हडस्ति ते कढोली दरम्यान मोठा पूल आहे. या पुलाखाली चंद्रपूर येथील काही मुले खेळत होते. दरम्यान त्यांना वर्धा नदी पात्रात पोहण्याचे ठरविले.मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने जुन्या वर्षाला निरोप देताना एकाचा त्यात मृत्यू झाला.ही घटना रविवारी सकाळी ११.30वाजता दरम्यान बल्लारपूर तालुक्यातील हडस्ति गावाजवळील पुला जवळ घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव जित्रू गावतुरे (१५ ) रा.नगीना बाग चंद्रपूर असे आहे.

चंद्रपूर येथील काही मुले बल्लारपूर तालुक्यातील हडस्ति गावा जवळच्या पुला खाली व्हालिबाल खेळत होते. यावेळी त्यांच्या सोबत एक मोठा युवक देखील होता.खेळ खेळल्यानंतर त्यातील चार जणांनी वर्धा नदीत पोहण्याच्या बेत केला.पोहत असताना त्यातील तिघे वर्धा नदीच्या पात्रातून बाहेर आले.मात्र जित्रू गावतुरे हा मुलगा खोल पाण्यात बुडाला. त्याला नदीच्या पात्रातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही.त्यामुळे त्याचा वर्धा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती बल्लारपूर तहसील प्रशासनाला देण्यात आली.

त्यावेळी नायब तहसीदार ठाकरे व नांदगाव ( पोडे ) येथील तलाठी महादेव कन्नाके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. दरम्यान गावातील नावाडी व एन डी आर एफ च्या पथकाने त्याचा शोध घेऊन सायंकाळी जितृचा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती ,बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांनी दिली.या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस अधिक तपास करत आहे.