🔹चिखलामुळे अपघात तर वाहतुकीस अडथळा(Mud causes accidents and obstructs traffic)
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बु (दि.24 जून) :- चिमूर शेगाव वरोरा नॅशनल महामार्गाचे काम सदर एस आर के कांत्रक्षण कंपनी कडे असून गेल्या अनेक वर्षंपासून या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असून अर्धवट अपुऱ्या कामामुळे दररोज ये जा करणाऱ्या प्रवास्याना मोठा नाहक त्रास सहन करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे .
या अपुऱ्या कामामुळे दररोज दिवसा ढवड्या , रात्री बेरात्री छोटे मोठे अपघात होतच असते . या अपघातात अनेक प्रवासी तसेच दुचाकी स्वार यमसदनी गेले तर काहींना अपंगत्व पत्करावे लागले आहेत.
अश्या भयानक परिस्थिती सदर कंपनी फक्त बघ्याची भुमिका घेत असून या कंपनीच्या कर्मचाऱ्याचे हलगर्जी पणामुळे वरोरा शेगाव चिमूर महामार्गाचे तीन तेरा वाजले असून रस्ता बांधकामात सर्रास पने भ्रष्टाचार करून आपले खिसे भरून पो बारा होतात. अश्या निष्क्रिय कर्मच्याऱ्या मुळे गेले अनेक वर्ष लोटून देखील या रस्त्याचे काम पूर्णतः पूर्ण झाले नाही .
शिवाय अर्धवट असलेले काम तसेच ठेऊन अनेक ठिकाणी खोदकाम करून तसेच ठेवले जाते या अर्धवट कामामुळे तसेच जास्तीच्या खोदकाम मुळे या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जणू मरणाला आमंत्रण देण्या सारखे झाले आहे ..
तर भर उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर भर पावसात चिखलाचा त्रास . अश्या अनेक त्रासाने प्रवासी कंटाळले असून देखील सदर कंपनी या गंभीर समस्या कडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असल्याने अनेक नागरिक संतापले असल्याचे दिसत आहे..
जेमतेम पावसाने हजेरी लावली असून शेगाव , चारगाव बू , चारगाव खुर्द , राळेगाव , परसोडा , सालोरी , बामणडोह या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असल्याने चिखलातून दुचाकी काढत असताना अनेक प्रवासी गाड्या स्लीप होऊन पडत असतात..तसेच मोठ्या वाहनांमुळे चिखल अंगावर उडत असल्याने मोठा मानसिक त्रास होत असतो.
तेव्हा प्रवास्याच्या समस्या लक्षात घेता सदर एस एम के कंत्रक्षण कंपनीने या ठिकाणी तात्काळ डागडुजी करून रस्ता सुरळीत सुरू करण्यात यावा जेणे करून दुचाकी स्वर प्रवस्यना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी … अन्यथा प्रवस्याना अधिक त्रास होत असेल तर कंपनी समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत लोडे यांनी पत्रकारांशी व्यक्त केले .
तसेच प्रवाशाच्या समस्या लक्षात घेता संबंधित विभागाने देखील यकडे लक्ष केंद्रित करून दोषी कंपनी वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे…