वरोरा शहरातील डेंगु व साथीच्या रोगांवर तातळीने उपाय योजना करावी…डाॅ.चेतन खुटेमाटे

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.13 सप्टेंबर) :- वरोरा शहरात डेंगु व इतर साथीच्या रोगांना आळा बसावा,शहरातील प्रत्येक घरी डेंगु,टायफाईड,चिकनगुनिया सारख्या रोगाने डोक वर काढल्यामुळे अनेक रुग्नांना दवाखाण्यात भर्ती करावे लागत आहे,त्यामुळे जनतेला प्रचंड त्रास व आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.

तसेच सब्जी मंडी परीसर तसेच वरोरा शहरातील बर्‍याच भागात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे या गंभीर विषयाकडे तातळीने लक्ष देवुन प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या जेणे करुन रुग्नवाढीस आळा बसेल.

जर नगर परीषद वरोरा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आठ दिवसात पुर्ण न केल्यास नगर परीषद वरोराच्या विरोधात आंदोलन केल्या जाईल असे निवेदन देतांना डाॅ.चेतन खुटेमाटे,संदिप सोनेकर,पलाश मदकुंटवार,चेतन पारखी,रुतिक जिवतोडे,हर्शल सोमटकर,वेदांत चाफले,सतिश परचाके,उल्हास बोढे,संकेत गोहकार,चंद्रशेखर झाडे ,सोहेल भाई उपस्थित होते.