वरोरा व चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या हाताला काम व शेतीला मिळणार मुबलक पाणी 

✒️चंद्रपूर.(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17 फेब्रुवारी) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजानेंतर्गत “High Impact Mega Water Shade Project” ची चंद्रपूर जिल्यात अंमलबजावणी होणार असून यासाठी जिल्यातील वरोरा आणि चिमूर तालुक्यामध्ये पुढील पाच वर्षात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

        जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सन्माननीय श्री. डी.कुंभार यांचे प्रमुख उपस्थितीत या अनुषंगाने 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले.यावेळी तहसीलदार साहेब,गट विकास अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी,नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी,उपवनसंरक्षक अधिकारी,तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी MSRLM अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत मग्रारोहयो अंतर्गत एक्सिस बँक फौंडेशन आणि भारत रूरल लाईव्हलीहुडस फाउंडेशन आणि मग्रारोहयो आणि सिएसओ म्हणून कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्यात सामंजस्य करार झाला असून चंद्रपूर जिल्यातील वरोरा आणि चिमूर या दोन तालुक्यामध्ये हा “High Impact Mega Water Shade Project” पुढील पाच वर्षापर्यंत प्रकल्प राबविण्यात येणार असून,सुमारे एक लाख शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच १.७७ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे हि या उपक्रमाची प्रमुख उद्धिष्ट आहेत .

       कार्यक्रमात प्रकल्पाबाबत भूमिका समजावून सांगण्यासाठी भारत रूरल लाईव्हलीहुडस फाउंडेशन कडून श्री.सुनील सहारे State Livelihood Integrator {BRLF} व श्री.सतीश माकोडे जिल्हा समन्वयक तथा कृषी विकास कडून टीम लीडर श्री.रोशन मानकर,प्रबुद्ध डोये,सुनील बावणे,श्रीपत पाटील,दीक्षांत राऊत व प्रफुल जुमडे उपस्थित होते.शेवटी उपजिल्हाधिकारी सन्माननीय श्री. डी.कुंभार यांचे प्रकल्पाबाबत केलेल्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.