वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदी कुंकु कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा

🔹महिला मंडळींनी उपस्थित राहण्याचे महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी) सौ. नर्मदाताई बोरेकर, तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे आवाहन

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.23 जानेवारी) :- हिंदु हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होवून ८०% समाजकारण व २०% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यात विशेषत: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विविध समाजपयोगी उपक्रम सुरू असतात.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या (वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी) माध्यमातून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात मकर सक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन हळदी कुंकु कार्यक्रम तथा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने परिसरात सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत रहावा, या हेतूने चांगल्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, करीता हळदी कुंकु, महिला स्नेहमिलन व वाण वाटप कार्यक्रम होणार आहे. 

भद्रावती तालुक्यात स्थानिक श्री. मंगल कार्यालयात दिनांक २६ जानेवारीला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगण, चोरा येथे २७ जानेवारीला, श्री महाविर हिन्दी हायस्कुल, माजरी येथे २८ जानेवारीला, किसान भवन, घोडपेठ येथे ०१ फेब्रुवारीला, भारतीय ग्रामिण विद्यालय, कुचना येथे ०२ फेब्रुवारीला, लहान हनुमान मंदीर, नंदोरी येथे ०६ फेब्रुवारीला, हनुमान मंदीर सिताबर्डी, चंदनखेडा येथे ०८ फेब्रुवारीला, तर वरोरा तालुक्यात ग्रामपंचायत भवन, टेमुर्डा येथे २५ जानेवारीला, वरोरा कर्मचारी महिला वर्ग २७ जानेवारीला, वसंत भवन, शेगाव येथे २९ जानेवारीला, बालाजी मंदिर, कोसरसार येथे ३० जानेवारीला, आठवडी बाजार पटांगण, नागरी येथे 31 जानेवारीला, गजानन महाराज मंदिर, बोर्डा येथे ०३ फेब्रुवारीला, शिवालय कार्यालय, वरोरा येथे ०४ फेब्रुवारीला, माढेळी किसान भवन येथे ०५ फेब्रुवारीला सदर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

या निमित्ताने सदर कार्यक्रमात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

वरोरा-भद्रावती विधानसभेतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंगीकृत सर्व विंग महीला आघाडी, युवा-युवती सेना व माजी सैनिक तथा विरपत्नी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंगीकृत सर्व विंगचे पदाधिकारी यांचे आयोजनात महत्त्वाचे स्थान असणार आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमास महिला मंडळींनी येण्याचे करावे, असे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी) सौ. नर्मदाताई बोरेकर, तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.