🔸वाढदिवसाचे औचित्य : जेष्ठ कार्यकर्ते, युवा व महिलांचा पक्षप्रवेश(Birthday celebrations: Senior workers, youth and women party entry)
🔹रविंद्र शिंदे यांनी दुर्धर आजारी रुग्णांना केले आर्थीक सहकार्य(Ravindra Shinde provided financial support to terminally ill patients)
✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.13 जून) :- शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख, यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत सकाळी ९:०० वाजता भद्रावती येथील ग्रामिण रूग्णालयात रूग्णाना फळवाटप करण्यात आले. पवन बोम्मा हया कॅन्सर रुग्णाला भद्रावती शिवसेना कार्यालयात आर्थीक मदत देण्यात आली.
वरोरा येथील उप-जिल्हा रूग्णालयमध्ये रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. खांजी वार्डातील पुरातन देवस्थान अंबामाता मंदिरात पुजन व महाआरती करण्यात आली. लगेचच मुख्य कार्यक्रम वरोरा येथील विधानसभा प्रमुखाचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे घेण्यात आला.
यावेळी प्रथम आई तुळजाभवानी मातेची पुजन व आरती करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यांनतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात करतांना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेचे पुजन करुन करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये प्रथम सत्रामध्ये विधानसभा क्षेत्रातील महिलांचा मेळावा घेण्यात आले. याप्रसंगी नवनिर्वाचित महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार व नियुक्तीपत्र तसेच महिला पक्षप्रवेश घेण्यात आला.
लगेचच व्दितीय सत्रामध्ये त्यानंतर गरजु व्यक्तीना शिवसेना पक्षातर्फे आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये भद्रावती तालुक्यातील मांगली येथील शरद प्रभाकर सातपूते, यांची दोन जनावरे विज पडल्यामुळे दगावली व भद्रावती तालुक्यातीलच माजरी येथील पिकी बाबाकांत मेश्राम ह्यांना स्तन कॅन्सर आजाराने पीडीत असुन उपचाराकरीता मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्थीक सहकार्य प्रदान करण्यात आले.
त्यानंतर वरोरा येथील जेष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला. युवा पक्ष कार्यकर्ते अनिल सिंग, शशिकांत राम व निखिल मांडवकर यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
यामध्ये सचिन दाते भुषण जुंबाडे शुभम बोबडे प्रतिक मुन कुनाल भगत, राहुल जुनारकर, बंटी हंसकार, कुनाल कांबळे, रोहन रेगुंडावार, गोलु मगरे, सचिन घनवे, सुहास धनवे, प्रल्हाद ढोके, मयुर पिंपळापुरे, बंटी खोब्रागडे, सुरज पारशिवे, अजय राऊत, भुपेश मंगाम, गणेश चौधरी, यश देव, सोनु सिंग, सचिन चिडे, रुद्र मेहरा, आदर्श सोयाम, लखन मोहितकर, समेश रामटेके, अनिकेत तुरारे.
अनिकेत वासेकर, सुलि बगाटे, तुषार बोरकर, अमन नायडु, सौरभ खापने, प्रितम ठाकरे, रसिक श्रीरामे, श्रेयश मिलमिले, धिरज भोयर, अभय कौशल, गौरव महातळे, रितेश सिडाम, अथर्व ठोंबरे, वैभव पेटकर, संकल्प रहाटे, वेदांत वराडे, विशाल मंगले, तेजस राऊत,रोहन नन्नावरे, बादल वरखडे, राजु पेंदोर, आशु बरडे, शुभम मोरे, अंकुश यादव, रितिक थेरे, प्रणय किर्तने, आशिष चिल्लमवार, अरबाज शेख, तेजस राऊत, गोटु गेडाम, अमित नन्नावरे, विकास गहुकर, साहिल आमने, निकेश वराटकर, आदित्य दातारकर, गणेश बदखल, तेजस ढाले.
आशु तुराणकर, हिमांशु चांदेकर, कार्तीक आत्राम, मंगेश नाईक, सुरज कष्टी, बादल राऊत, अंशुल राजुरकर, प्रसिद पिपरे, अर्जुन राऊत, रमेश नामे, अशोक यादव, कपील गेडाम, अनमोल वराटे, शुभम कोहपरे, आदित्य मडावी, अभय लांडगे, समिर तुरारे, चेतन कुर्जेकर, साहिल ठेंगणे, आयुष तांडेकर, प्रतिक मस्करे, रोशन ढवस, शुभम माथनकर, रितीक ताजणे, तुषार पाकमोडे, सौरभ उरकुडे, चेतन ढवस, सचिन डांगे, हर्षल गायधने, आशिष कटोते, राहुल सलामे, हर्षल बावणे, अजय मडावी.
शंतनु लांडगे, निकेश दडमल, चेतन बावणे, रुपेश चिंचोलकर, अनिकेत लोहकरे, अनिकेत तामटकर, वैभव चौधरी, अक्षय नागापुरे, मनिष क्षिरसागर, हिमांशु गानफाडे, रितीक सावरकर, वैभव कोवे, वैभव किन्नाके, करण पंधरे, निकेतन जिवतोडे, शिवा पंधरे, जुनेद शेख, पंकज पेचे, करण परचाके, अमोल कटवटे, अनुप पावडे इत्यादी युवकांनी पक्षप्रवेश घेतला,
याप्रसंगी पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व प्रवक्ता शिल्पाताई बोडखे, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापिठ तथा पुर्व विदर्भ समन्वयक युवासेना निलेश बेलखेडे, विधानसभा प्रमुख रविद्र श्रीनिवास शिंदे, चंद्रपूर जिल्हासंघटीका नर्मदाताई बोरेकर, भास्कर ताजणे, वरोरा-भद्रावती विधानसभा उप-जिल्हा प्रमुख, वरोरा तालुका प्रमुख दताभाऊ बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदुभाऊ पढाल.
भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, भद्रावती युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर, वैभव डहाणे, सुधाकर बुराण, प्रशांत कारेकार, सचिन चुटे, रवी रॉय, मंगेश भोयर, अश्लेषा जिवतोडे, प्रिती पोहाणे, प्रतिभा मांडवकर, रवी भोगे, गजानन कुरेकार, गजानन गोवारदिपे, अरुण घुगुल, कल्पनाताई टोंगे, सुष्माताई शिंदे, निर्मलाताई शिंदे, रोहन कुटेमाटे, ज्ञानेश्वर डुकरे, अनुप कुटेमाटे आदी मान्यवर तसेच मोठया संख्येने जेष्ठ, युवा, महिला कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना रविंद्र शिंदे म्हणाले की, वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षातर्फे सुरू असलेले सामाजिक कार्य असेच सुरू राहणार व शिवसेना पक्ष 80% समाजकारण व 20% राजकारण करणारा असुन यात कोणताही प्रकारचा भेदभाव करण्यात येत नाही.
समाजातील सर्व स्तरातील नागरीकांना समान हक्क या नात्याने कार्य करणारा हा पक्ष आहे. तसेच चालवित असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातुन सुध्दा गरजु नागरीकांना मदत करण्याचे कार्य अविरत सुरु राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा मांडवकर तसेच मंगेश भोयर यांनी केले. आभार प्रदर्शन अश्लेषा जिवतोडे यांनी केले.