🔸आरक्षणाचा मुद्दा ५० दिवसाची मुद्दत संपली
✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि .22 नोव्हेंबर) :- महाराष्ट्रात धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी 50 दिवसाची मुदत मागितली होती. हा 50 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एरणीवर असतांना आपल्याही धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा. अशी इच्छा धनगर समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास करून उचित निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून देण्यात आले होते. परंतु या दिवसाची मुद्दत संपली असून कोणताही निर्णय आतापर्यंत आला नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आता धनगर समाज उभा झाला असून आणि शांततेत मुख्यमंत्री यांना जिल्हा व तालुका स्तरावर तहसीलदार मार्फत धनगर आरक्षण व सोबतच सात योजनांची मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी वरोरा तहसील कार्यालय वरोरा येथे तहसीलदार योगेश कौटकर यांना वरोरा तालुका धनगर समाज बांधवानी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी निवेदन देते वेळी गजानन शेळके, सोनूताई येवले, डॉ. सरवदे, प्रभाकर ढाले, संजय बोधे, रवींद्र गावंडे, शिरीष उगे, गणेश चिडे, रमेश चिडे, वसंत खाणेकर, वसंत काळे, रामकृष्ण बोबडे, अशोक वैद्य, श्रेयश झाडें, गजानन नवघरे, ज्ञानेश्वर झिले, अतुल येवले, मंगेश झिले, भारत झिले, प्रफुल करडे, अश्विन धावणे, डॉ संकेत झाडे, विजय धावणे, तुकाराम धावणे, मनोज झाडे, आराध्य धावणे, बंडू, डाखरे, अशोक तुरारे, मारुती धोटे, बंडूजी ठाकरे, अजिंक्य काळे आशिष गोंडे, निकेश मोटके, दशरथ लाखे पंडित लोंढे, प्रामुख्याने उपस्थित होते.