वरोरा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

✒️हरीश केशवानी वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.6 सप्टेंबर) :- श्री. झोपला मारोती देवस्थान, मोकाशी ले-आऊट, वरोरा येथे युवासेना माजी जिल्हा प्रमुख मनीष भाऊ जेठाणी यांच्या वतीने मागील चार वर्षा पासून तान्हा पोळा आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी सुद्धा तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

तान्हा पोळा करीता गुढीचे मानकरी वामनराव खिरटकर यांनी गुढी व गुलाबराव जगताप यांनी नंदी पूजन केले. सदर कार्यक्रमात लक्की ड्रॉ पद्धतीने टोकन काढून बक्षीस वितरण करण्यात आले. बाल-गोपालांकरिता 3 मोठी सायकल, 2 लहान सायकल, 2 स्टडी टेबल, 2 क्रिकेट किट, आणि 2 बॅडमिंटन किट, असे एकूण 11 बक्षीस ठेवण्यात आलेली होती.

तसेच एकूण 300 नंदीची नोंदणी व्यवस्था करण्यात आली होती. नोंदणी केलेल्याना एक टिफिन बॉक्स भेट स्वरूपात देण्यात आली. सदर कार्यक्रमाकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रमेश जाजू, प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीजी जेठाणी, डॉ. प्रशांत पिपळकर, नारायणरावजी वराटकर, डी. एन. माथनकर, अरुनजी ढोके, पुरुषोत्तम पिदुरकर, हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक, कार्यक्रमाचे आयोजक. मनीष जेठाणी यांनी व सूत्रसंचालन कु. हार्दीकी चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता श्री. झोपला मारोती देवस्थान वरोराचे सुनील कोल्हे, नितीन उमरे, अशोक ढवस, बंडू पिपळकर, रामदास जी भोयर, . दशरथ लाखे, अरुण उमरे, ई. कार्यकर्ते तथा शहरातील लोक प्रचंड प्रमाणात उपस्थित होते. लोकांची एकच गर्दी उसळली होती.