वरोरा येथे जागतिक आरोग्य दिवस व सुंदर माझा दवाखाना याचे उद्घाटन थाटात  Inauguration of world health day and sunder majha dawakhana at warora

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)       

सर्वांसाठी _आरोग्य “””समान_                     आरोग्य _

वरोरा (दि.8 एप्रिल) :- आरोग्य चांगले राहावे आणि सूध्रुढ राहावे याच्या प्रचाराचा दिवस.मा . खासदार बाळु भाऊ धानोरकर यांनी रेड रिबीन कापून दिप प्रज्वलन करून जागतीक आरोग्य दिवस व सुंदर माझा दवाखाना या महाराष्ट्र शासनाच्या मोहीमेचे उद्घाटन अती थाटात साजरे करण्यात आले.

तसेच मा.धानोरकर साहेब यांनी अध्यक्षीय स्थान भुषविले.प्रमुख पाहूणे मा. डॉ महादेवराव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर,मा.डाॅ हेमचंद किन्नाके निवासी वैद्यकीय अधिकारी,मा.सुभाष दांदडे खासदार प्रतीनिधी,मा. डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक,मा.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका मंचावर उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी रेड रिबीन कापून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

मा .डाॅ चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.मा . बाळु भाऊ धानोरकर यांनी जिवन शैलीत समजवून सांगितले व त्याबाबतची विस्रुत मार्गदर्शन केले.कोरोना काळात सर्व रूग्णालयाच्या कर्मचारी यांनी चांगली मेहनत घेऊन रुग्णांचे प्राण वाचविले.कर्मचारी यांच्यावर शाब्बासकीची थाप दिली.खूप कौतूक केले.

या कार्यक्रमाचे आयोजन मा.डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन श्री कूंभारे यांनी केले.आभारप्रदर्शन श्री येडे यांनी केले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी आरोग्याची व सुंदर माझा दवाखाना ची शपथ वाचली.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाला सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, श्रीमती कापटे, परीसेविका श्रिमती कोडापे परीसेवीका सौ कुमरे सौ पूसनाके परीसेविका सौ रुयीकर,सौ मोगरे सौ सूजाता जूनघरे सौ खडसाने, यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.