वरोरा येथे एका शाळेच्या शिक्षकांनी 16 वर्षीय विद्यार्थिनीचा केला विनयभंग

🔹शिक्षण विभागात उडाली खळबळ

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठान न्यूज नेटवर्क) 

वरोरा (दि.30ऑगस्ट) :-

शिक्षण क्षेत्रात विभागात खळबळ उडवून टाकणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली होती, शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती व या दरम्यान २० ऑगस्ट रोजी बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन पाहायला मिळाले होते, संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा अनेक तास रोखून ठेवली तर ज्या शाळेत अत्याचार झाले, त्या शाळेचीही आंदोलकांनी तोडफोड केली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच वरोरा येथील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला दोन शिक्षकांनी शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून वरोरा पोलीस स्टेशनं येथे आरोपी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, दरम्यान या घटनेच्या विरोधात शाळेसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले असल्याने सगळीकडे वातावरण पेटले असल्याचे दिसत आहे.

मुलीं व महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुरी दिली गेली. मात्र, अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. या विधेयकात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या आणि विधानसभेने एकमताने मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही? हा मोठा प्रश्न असून राज्यात ज्या पद्धतीच्या घटना घडत आहे त्यावरून शरीयत सारखे कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच बदलापूरच्या घटनेच्या पार्शवभूमीवर केले होते.

वरोरा येथील एका नामवंत शाळेत शिकत असलेल्या 16 वर्षीय मुलीवर त्याच शाळेच्या बेलेकर व पिरंके या दोन शिक्षकांनी छेडखानी केल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनं येथे केली असता आरोपी शिक्षकांवर कलम 354 व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याची माहिती असून आरोपी शिक्षक फरार झाले असल्याची माहिती समोर येत आहे.