🔸जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात खांबाडा येथे शाखेचे उद्घाटन
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि .23 सप्टेंबर) : – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानांतर्गत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत वरोरा-भद्रावती विधानसभेतील विविध गावांमध्ये शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचा विस्तार होत असून, खांबाडा गावात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
उद्घाटन प्रसंगी मुकेश जिवतोडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत शिवसेनेच्या शाखांच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. “गावातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना एका ठोस व्यासपीठावर आणणे हे या शाखांचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना अधिक प्रभावीपणे तयारी करत असून, या शाखांद्वारे गावागावात शिवसैनिकांचे जाळे विणले जात आहे.
कार्यक्रमाच्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमाला प्रतिसाद दिला. स्थानिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन जिवतोडे यांनी दिले. पाणी, रस्ते, आणि अन्य मूलभूत सुविधांच्या बाबतीत ग्रामस्थांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर,प्रकाश कडुकरं, सूरज बावणे, अनिल ढोबळे, सुरेश कडुकरं, गुणवंत खिरटकर, धर्मेंद्र वायदुळे, हनुमान शिंदे,रिजवान शेख,निखिल वाटमोडे,विनोद डुकरे,क्षितिज देठे,जेष्ठ शिवसैनिक श्यामराव काटकर, जेष्ठ शिवसैनिक चंपत नन्नावरे, प्रकाश वर्भे, रोशन चौधरी,कैलास चिकटे, इशांत मांगरडुकरं, तुषार उराडे,सुभाष बोधे, सचिन राऊत,सिद्धार्थ सोयाम, रोशन पेंदोर, आदर्श घेणघारे,शिवसैनिक, ग्रामवासी उपस्थित होते.