वरोरा भद्रावती विधानसभा निवडणुकीत मनसेचे राजू कुकडे इतिहास घडविणार

🔹सर्वसामान्य जनतेचा आवाज बनलेल्या राजू कुकडे यांना शेतकऱ्यांचे जोरदार समर्थन

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.22 ऑक्टोबर) :- विधानसभा निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाल्यानंतर वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात प्रमुख पक्षांकडून कोण उमेदवार असेल याबद्दल उत्सुकता लागली असतांना व अजूनपर्यंत कुठंलाही उमेदवार जाहीर झाला नसताना मनसे कडून राजू कुकडे यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे, दरम्यान वरोरा येथील मनसेच्या “राजगड” या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणारे राजू कुकडे यांना गोरगरीब दुःखी पिडीत व शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून जनतेचा मोठा पाठिंबा मिळतं असल्याचे चित्र आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजू कुकडे हे पूर्व विदर्भात मनसेचे प्रथम आमदार होऊन इतिहास घडवू शकतात अशी परिस्थिती आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात कांग्रेस कडून प्रवीण काकडे तर महायुती कडून शिंदे गटाचे उमेदवार अनिल धानोरकर असणार अशी चर्चा आहे, वंचित कडून अँड रायपुरे किंव्हा मग डॉ. चेतन खुंटेमाटे, तिसरी आघाडी प्रहार कडून अहेतशाम अली आणि अपक्ष म्हणून मुकेश जीवतोडे, अँड पुरुषोत्तम सातपुते, डॉ. खापने, ओम मांडवकर, राजू गायकवाड, किशोर टोगे, नरेंद्र जीवतोडे, रमेश मेश्राम अँड, महेश ठेंगने हे संभावित उमेदवार आहे. परंतु या सर्व उमेदवारापैकी राजू कुकडे हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शासन प्रशासनासोबत लढत असल्याने व त्यांनी शेतकऱ्यांचा पीक विमा व सोयाबीन च्या हमी भावासाठी लढा दिला असल्याने शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतं आहे. दरम्यान ग्रामीण भागात ज्यांचे वर्चस्व तोच उमेदवार विजयी होतो हा आजवरचा राजकीय इतिहास राहिल्याने मनसे उमेदवार राजू कुकडे हे वरोरा भद्रावती या विधानसभा क्षेत्रात इतिहास घडविणार अशी शक्यता वाढली आहे.

काय आहे राजू कुकडे यांच्या विजयाचे गमक?

मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे आपल्या वरोरा येथील राजगड या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवित आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता त्यांनी मुंबई पर्यंत शेतकऱ्यांना सोबत घेऊन 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, शेताला जोडणारे पांधन रस्ते झाले पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केले, सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची शेत जमिनी सावकाराकडे जाऊ नये यासाठी प्रशासनासोबत लढा दिला त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांना शेतकऱ्यांनी समोर केले आहे, दरम्यान चंद्रपूर प्रेस क्लब तेथे जवळपास दीडसे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पत्रकार परिषद घेऊन राजू कुकडे यांना मनसेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या स्वाक्षरीनिशी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे मनसेची उमेदवारी राजू कुकडे यांनाच मिळावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. दरम्यान जनतेचा असा आशीर्वाद कुणाही उमेदवाराला सहजासहजी मिळतं नसल्याने राजू कुकडे यांना मिळालेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे राजू कुकडे विजयी होणार असल्याचे चित्र आहे.

प्रवीण सूर अचानक मनसे कडून कसे काय?

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून पक्षाची संघटन बांधणी केली असतांना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार हे राजू कुकडे यांचा विरोध करून त्यांचे व्यवसायिक पार्टनर प्रवीण सूर यांना समोर करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी मेळावा घेतला परंतु मनसे हा पक्ष व त्या पक्षाचे नेते राजसाहेब ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले असल्याने बाहेरून आलेल्या प्रवीण सूर यांना उमेदवारी मिळणे शक्य नाही परंतु तरीही मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजू कुकडे विरोधात वरिष्ठाकडे जर शिफारस करून प्रवीण सूर ला उमेदवारी दिली तर मनसेची इथे वाताहत होईल अशी शक्यता आहे.