✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.14 सप्टेंबर) :- हिंदू समाजाच्या सण उत्सवाचे दिवस सुरु असून गणेशोत्सवात विविध मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंडळाना गावातून व शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिक दर्शनाला येत असून गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यासह गणेश विसर्जन करण्यास मंडळाना परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाजपा युवा नेते किशोर टोंगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नयामी साटम यांच्याकडे केली आहे.
अनेक कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन चालते मात्र हिंदूंच्या सण-उत्सवांना बडगा का असा प्रश्न किशोर टोंगे यांनी यावेळी विचारला. गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकीत रात्री बारा पर्यंत वाद्य वाजवीण्याची परवानगी मिळावी अशी अनेक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना असून त्याचा मान ठेवावा अशी भूमिका किशोर टोंगे यांनी मांडली.
प्रशासनाने दुटप्पी भूमिका ठेवत परवानगी नाकारली तर मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रोशास पोलिसांना सामोरे जावे लागेल त्यामुळे पोलीस प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्ताच्या भावना विचारात घ्यावात अशी चर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी नयामी साटम मॅडम यांच्याशी झाल्याचे किशोर टोंगे यांनी सांगितले व हिंदू बांधवांच्या सणं समारंभात पोलीस प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.