वरोरा-भद्रावती तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पिक विमा भरण्यास मुदतवाढ द्या

🔹भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांचे कृषी मंत्र्यांना निवेदन  

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 ऑगस्ट) :- गेल्या महिनाभरापासून चंद्रपूर जिल्यात विशेषतः आमच्या वरोरा व भद्रावती तालुक्यात सतत पाऊस असून नद्या-नाले ओसंडून भरून वाहत आहे, त्यामुळे अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदी-नाल्या लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहे. यातून विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे असल्याचे किशोर टोंगे यांनी म्हटले आहे.

शेतकरी मोठ्या उमेदीने सर्व गोष्टींनी प्रयत्न करत असतो. मात्र सततच्या पावसाने व या दुष्काळाने काही शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झालं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. या प्रश्नांवर सरकारने तातडीने दखल घ्यावी अस ते निवेदनात म्हणाले.   

वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील सोयाबीन आणि कापूस पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात असून शासनाच्या पिक विमा भरण्याची मुदत देखील आमच्या शेतकरी बांधवांना वाढवून द्यावी तसेच शासनाच्या माध्यमातून तात्काळ या पिकांचे पंचनामे करून १००% पीक गेलेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रु.एकरी आणि सरसकट शेतकऱ्यांना १५ हजार रु. एकरी एवढी रक्कम अनुदान म्हणून द्यावी अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.

शेतात दिवस रात्र राबराब राबणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांचं पीक पूर्णतः नष्ट झालं झाल आहे अशा परिस्थितीत आपण तत्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांनी आधी तहसीलदार यांना निवेदन देऊन तर आता थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देत केली आहे.