वरोरा पोलिसांनी पकडली ३लाख ३०हजार रुपयांची रोख सह,९ लाखाचा मुद्देमाल

🔸निवडणुकीच्या तोंडावर वरोरा पोलिसांची मोठी बेधडक कारवाई

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.15 नोव्हेंबर) :- माननीय पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नवमी साठम मॅडम तसेच ठाणेदार श्री अजिंक्य तांबडे सा. पोलीस स्टेशन वरोरा यांचे मार्गदर्शना खाली डीबी पथक श्री पोउपनी दिपक ठाकरे , पो. स्टॉप पोहवा दिलीप सुर /2244, पोअ. महेश गावतुरे/2643, पोअ संदिप मुळे/2571 पोलीस स्टेशन वरोरा असे वरोरा टाऊन मध्ये कोबींग ऑपरेशन रात्री दरम्यान यात्रा वार्ड वरोरा परीसरात गुन्हेगार चेक पेट्रोलींग करीत असतांना यात्रा वार्ड वरोरा येथे बुद्ध भुमी समोरील रोडवर महीद्रा कंम्पनीची बोलोरो चार चाकी वाहन क्र. एम.एच.34-सी.जे.-3175 संक्षयास्पद मिळुन आली त्यामध्ये चालक व इतर ईसम मिळुन आल्याने त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता वाहन चालकाने आपले नाव आशीश रमेश मिठपल्लीवार वय 21 वर्ष राह. बोर्डा वार्ड न.-2 वरोरा 2) बाजुला गाडीत बसुन असनारा ईसम नामे दारासींग संगतसींग दुधानी वय 28 वर्ष राह. काँलरी वार्ड वरोरा असे मिळुन आले. सदर ईसमाची व बोलोरो वाहनाची झडती घेतली असता सदर बोलोरो वाहनात एका कापडी पिशवित एकुन नगदी रोख रक्कम 3,28,820/- रु व बोलोरो गाडी किमत अंदाजे 9,00,000/- रु असा एकुन किमत 12,28,820/- रु चा माल मिळुन आला (ज्यात 500/-रु, 200/-रु, 100/-रु,50/-रु,20/-रु,10/-रु प्रमाणे नोटा) नमुद दोन्ही ईसमांना त्याच्या ताब्यातील वाहनामध्ये मिळुन आलेल्या पैश्या बाबत विचारपुस केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही सदर पैश्या बाबत कोणतेही वैद्य कागदपत्रे नसल्याचे सांगीतले.

नमुद ईशमांनी सदर पैसे हे विधानसभा निवडनुक सबंधाने वाहतुक करीत असल्याचा संक्षय आल्याने नमुद दोन्ही ईसमांना वाहन व पैश्यासह ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता निवडनुक भरारी पथक वरोरा यांना सुचना देवुन पुढील कार्यवाही करण्यात आली.