वरोरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा लागु करावा Soybean farmers in Warora taluka should be given crop insurance immediately

▫️आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.19 सप्टेंबर) :– वरोरा तालुक्यातील सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्यामुळे दोनच दिवसात संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे पीक हंगामात हवामानातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाचे होणारे नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लागु करावा,अशी मागणी जिल्हा स्तरीय समितीच्या चौकशी दरम्यान आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.

       आज दि.१९ सप्टेंबर २०२३ रोजी मा.जिल्हाधिकारी, यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा स्तरीय समिती मधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री शंकरराव तोटावार, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही चे डॉ.विनोद नागदेवते,कृषी अधिकारी श्री विनोद कोसनकर,ओरियंटल इन्शुरन्स कंपनी चे जिल्हा प्रतिनिधी श्री कारपेनवार व चौधरी यांनी वरोरा तालुक्यातील विविध महसूल मंडलमधील चारगाव( बु) , चारगाव (खुर्द) व शेंबळ, या गावातील सोयाबीन नुकसान क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली.

या दौऱ्यामध्ये आमदार धानोरकर मॅडम यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी लोकप्रतिनिधी व संपुर्ण कृषी विभाग आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. व संपूर्ण वरोरा तालुक्यात मिड टर्म अडवर्सिटी (Mid term adversity)तात्काळ लागू करून तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अश्या सूचना केल्या.

  या दौऱ्यात मंडळ कृषी अधिकारी,शेगांव बु. श्री विजय काळे,मंडळ कृषी अधिकारी, श्री घनश्याम पाटील,कृषी अधिकारी मारोती वरभे,श्री राजुभाऊ चिकटे, श्री योगेश वायदुळे, श्री योगेश खामनकर,श्री ईश्वर सोनेकर,श्री संदीप थुल,श्री बंडू शेळकी व परिसरातील ५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.