✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.20 सप्टेंबर) :- वरोरा तालुक्यातील गेल्या अनेक दिवसापासून पावसाचे थैमान सुरू असून दररोज मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या पावसाची हजेरी नक्कीच असते या सतातधर पावसाने अनेक पिके पाण्याखाली येत असल्याने पिके नष्ट होण्याच्या मार्गात लागले तर या पिकावर अनेक रोगाचे संकट लागले असून अनेक रोगाने सोयाबीन पीक ग्रासले आहे.
त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रत्येक बळीराजा शेतकरी आपल्या सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु पिकावर नवनवीन रोग येत असल्याने शेतकऱ्याच्या हातात आलेले पीक गमवावे लागत आहे.त्या करिता येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
सविस्तर असे की मागील काही दिवसांपासून वारंवार पाणी पडल्याने शेतकऱ्यांचा शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहेत. पाण्यामुळे शेतातले सोयाबीन पिकावर येतो मोझाक आणि करपा या रोगांचे प्रमाण वाढले असता संपूर्ण सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील तलाठी यानी शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करून तहसील कार्यालयात अहवाल सादर जमा करून घ्यावे असे आदेश आपण आपल्या शासन स्तरावर देण्यात यावे.
तसेच सर्व पीडित शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान म्हणून भरपाई देण्यात यावी. याच सोबत शेतकऱ्यांनी काढलेल्या आपल्या पीक विमाचा देखील लाभ त्यांना तात्काळ देण्यात यावा …अशी मागणी प्रहार सेवक या सोबत त्यांच्या कार्यकर्तानी केली असून जिल्ह्याचे जील्ह्याधिकरी यांना निवेदन सादर करून भरापाईची मागणी केली आहे.