वरोरा तालुक्यातील मौजा चिनोरा च्या पारधी टोला गावातील शेतीचे अतिक्रमण काढा

🔹गावकरी धडकले तहसील कार्यालयात, गावात सुविधेचा अभाव तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष कां

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि .17 जुलै) :-

तालुक्यातील मौजा चिनोरा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पारधी टोला यां गावात शासनाने अनेक सुविधा देऊन पारधी भटक्या समाजाचे एक प्रकारे पुंर्वसन केले आहे मात्र या गावाचे लगत असलेल्या शेतकऱ्यांनी मौजा चिनोरा सर्वे क्रमांक 2 आराजी 9.54 हेक्टर आर या सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पारधी टोला वस्ती मधील पारधी समाजाच्या परंपरागत शेळी पालन दुग्ध व्यवसाय कारण्याकरिता जनावरांना जागाच शिल्लक नसल्याने व आजूबाजूने सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले शेतकरी जनावरांना बांधावर सुद्धा येऊ देत नसल्याने या लोकांनी करायचे तरी काय?

हा यक्ष प्रश्न पडला असून सरकारी जागेवरचे अतिक्रमण काढून पारधी समाजाला सरकारी जागा उदरनिर्वाह कारण्याकरिता द्या या मागणीला घेऊन आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, भाजप नेते रमेश राजूरकर यांच्या पुढाकाराने पारधी समाजाचे महिला पुरुष तहसील कार्यालयात धडकले व तहसीलदार यांना निवेदन देऊन आमच्या मागण्या लवकर पूर्ण करा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला.

चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेला पारधी टोला हे गाव सन 1975 पासून स्थापित करण्यात येऊन सरकारने या गावात जिल्हा परिषद ची प्रार्थमिक शाळा, अंगणवाडी, नळ योजना हातपम्प व सार्वजनिक हनुमान मंदिरासाठी जागा दिली परंतु सदर जागेचा पारधी समाजाच्या लोकांना पट्टा मिळाला नाही व ग्रामपंचायत चिनोरा येथील सरपंच sadasyaniही जागा गावठाण म्हणून मागणी केली नाही त्यामुळे पारधी समाज एवढी वर्ष या जागेवर राहत असतांना त्यांच्याकडे या जागेचा ताबा नाही.

व सरकारी जागेवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ती जागा वाहतीत आणली त्यामुळे पारधी समाजाला गुराढोरांना व बकऱ्यांना चारा मिळत नाही पर्यायाने त्त्यांच्या उपाजीविकेचा प्रश्न उभा ठाकला आहे.

करिता पारधी टोला गाववस्तीत जे अतिक्रमण झाले ते हटाविण्यात यावे व पारधी समाजाला जागेचे पट्टे यावे अन्यथा पारधी समाज एकत्र ठेऊन प्रशासनाविरोधात आंदोलन करेला असा इशारा धर्मेंद्र शेरकुरे व राजू कुकडे यांनी दिला, यावेळी पारधी टोला मनसे शाखा अध्यक्ष सुनील घोसरे दिवाकर नंनावरे… इत्यादीची उपस्थिती होती.