🔹वरोरा तालुक्यातिल ते दोन महारती कोण
✒️ होमेश वरभे (माढेळी प्रतिनिधी)
माढेळी (दि.25 जून) :-
चंद्रपुर जिल्यातील वरोरा तालुक्यातील माढेळी गावालगत असलेल्या शेकापुर वाळू घाटातुन मोठ्या प्रमाणत वाळूचा अवैध उपसा होत असताना शासन प्रशासन याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्षा का करत आहेत असा प्रश्न आता सर्वसामान्या लोकांना पड़त आहे. वर्धा जिल्यातील अनेक वाळू घाट शासनाचा अटी शर्तिनी लिलाव झाले पण वर्धा जिल्यात येत असलेल्या शेकापुर बाई वाळू घाटाचे चित्र वरोरा तालुक्यातील नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ठेकेदारांनी व वाळू तस्करी करणाऱ्या लोकांनी पार बदलावून टाकले आहे.
या बाबद वरोरा माढेळीतील नागरिकानी रस्ता कोड़ी, या वाळू चा वाहननी होते असलेले अपघात या बाबद शासन प्रशासनाला अनेक तक़रारी केल्या असून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे खास जवळीक असणारे हे वाळू तस्कर असल्यामुळे त्यांना वाचविण्यात येत आहे.
विश्वसनीय सूत्र च्या माहिती प्रमाने वरोरा तालुक्यातील ते दोन वाळू तस्कर व ठेकेदार हे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खुप जवळचे असून त्यांना शासन प्रशासन दबावा पोठे अभय देत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या केलेल्या तक़रारीना केळाची टोकरी दाखवून त्यांच्या बचाव केला जात आहे.