✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.28 ऑगस्ट) :- वरोरा तालुक्यातील संपूर्ण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक आंदोलन करून देखील प्रशासकीय अधिकारी झोपेत आहे, अनेक निवेदन दिले. त्या नंतर काही रस्ते मंजूर झाले तरी देखील अजून कामाला सुरुवात झाली नाही.
बांधकाम विभागाला निधी उपलब्ध नसेल तर आम्ही भीक मांगो आंदोलन करून ते पैसे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवू असे निवेदन तहसीलदार साहेब वरोरा मार्फत पाठविण्यात आले. खराब रस्त्यामुळे अनेक गावातील बससेवा बंद झाली आहे.
विद्यार्थ्यांंना त्रास सहन करावा लागतो आहे. खासगी वाहनांची जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे यामुळे विद्यार्थ्यांंना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते हा प्रश्न पडला आहे. लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. लाजिरवाणी बाब आहे की रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे बस बंद होतात. या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासकांना जाग आली नाही.
यासाठी विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे तसेच उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे व तालुका प्रमुख दत्ता भाऊ बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. नागरी, माढेळी, उखर्डा, वाघनख, महाडोळी, शेगाव, चीकणी, बामर्डा, आजनगाव, बोपापुर, वडगाव, केळी, हीवरा, उमरी, बोरगाव, बोर्डा, चारगाव, पवणी व सर्व रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा भीक मांगो आंदोलन करून ते पैसे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला. यावेळी प्रतिभा मांडवकर सरपंच तथा युवती जिल्हा अधिकारी, निखिल मांडवकर, रोशन भोयर, आदित्य जूनघरे आदी उपस्थित होते.