🔸विद्यार्थ्यां करीता अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.- मा. आश्विन मुसळे,अध्यक्ष जिल्हा बुद्धिबळ संघ,चंद्रपूर
✒️परमानंद तिराणीक वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.3 एप्रिल) :- नीरजा समूह महाराष्ट्र राज्य व आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 02 एप्रिल 2023 ला घेण्यात आली. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
स्पर्धेमध्ये दोन प्रवर्ग होते,पहिला प्रवर्ग १५ वर्षाखालील स्पर्धकांसाठी तर दुसरा प्रवर्ग खुला प्रवर्ग म्हणून होता. प्रत्येक प्रवर्गात प्रत्येकी ५ बक्षिसे ठेवण्यात आलेली होती.खुल्या प्रवर्गात अजय गेडाम हे प्रथम क्रमांक प्राप्त केले. (द्वितीय) प्रसाद देशपांडे (तृतीय)राज ठाकरे (चतुर्थ), अक्षय बालगुलवार (पाचवे) पराग हांडे अशी खुल्या प्रवर्गातील विजेत्यांची नावे आहेत.
१५ वर्षाखालील स्पर्धकांत राहुल लोखंडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. वेद पाहुर (द्वितीय), संस्कार मोरे (तृतीय), परिणीती अर्डे (चतुर्थ), इशनराज थेरे (पाचवा) अशी १५ वर्षाखालील प्रवर्गातील विजेत्यांची नावे आहे. या सर्वांना रोख रक्कम व मेडल ट्रॉफी देण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आश्विन मुसळे अध्यक्ष जिल्हा बुद्धिबळ संघ चंद्रपूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके सर व चंद्रशेखर सर यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. प्रमुख पाहुणे मा.तानाजी बायस्कर उपस्थित होते. कार्यक्रमाला आयोजित करण्यास अभिजीत अष्टकार, नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक,नेहरू विद्यालय शेगाव बूज .),तानाजी बायस्कर,(शारीरीक क्रिडा विभागप्रमुख,आनंदवन) यांनी अथकपणे प्रयत्न केले.स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल सर्वांनी अभिनंदन केलेले आहे.