✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.2 मे ) :- वरोरा चिमूर महामार्गांवर वरोरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या बाम्हणडोह नाल्याजवळ वाहन चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने वाहन एम. एच. ३४ बी. आर. ७५५३ क्रमांकाचे बॅलेनो वाहनाचा अपघात झाला.
हा अपघात एवढा भीषण होता कि वाहन चार पल्टी खाऊन वाहन रस्त्याच्या खाली घुसले. त्यात एकाला गंभीर दुखापत झाल्या मुळे त्याला तात्काळ वरोरा येथे हळविण्यात आले.
हे वाहन बल्लारशाह येथील असल्याची माहिती चालकांनी दिली असून सदर वाहन चालक हा दारूच्या नशेत टल्ली असून भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याचे काही प्रत्यक्ष दर्शिने नागरिकाने सांगितले. विशेष म्हणजे यात सुदैवाने काहीही जिवीत हानी झाली नाही ..