वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ अब्दुल शेख याची अर्वांच्य भाषेत रुग्णांच्या नातेवाईकाला शिवीगाळ

🔹महाराष्ट्र सैनिक बाळू गेडाम यांनी मस्ती जिरवली, सामाजिक माध्यमावर व्हिडीओ व्हायरलं, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मनसेची तक्रार

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.10 सप्टेंबर) :-

वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात बिएचएमएस असलेले डॉ. अब्दुल शेख हे मागील अनेक वर्षांपासून इथे कार्यरत असून ते वरोरा नगरपरिषदच्या डॉ आहेत, पण ते उपजिल्हा रुग्णालयातचं ड्युटी करतात दरम्यान रुग्णांसोबत त्यांची भाषा ही अर्वांच्य व अरेरावीची असून महिला रुग्ण असतांना त्यांच्या देखत अश्लील भाषा ते वापरत असल्यामुळे वरोरा तेथील रुग्णांसोबतचं उपजिल्हा रुग्णालयातील स्टॉफ सुद्धा या डॉक्टर मुळे त्रस्त असून काल दिनांक 9/9/2024 ला लहान मुलांची तपासणी त्यांच्याकडे असतांना त्यांनी एका रुग्णांच्या नातेवाईक यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली होती.

त्यावेळी महाराष्ट्र सैनिक बाळू गेडाम हे आपल्या लहान मुलाला घेऊन रुग्णालयात उपस्थित असतांना त्यांनी डॉ. अब्दुल शेख यांची खरडपट्टी काढून त्यांची मस्ती जिरवली, दरम्यान डॉ शेख हे शिवीगाळ देतानाचा व्हिडीओ व्हायरलं होतं असून डॉ शेख या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्वरित निलंबानाची कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे व उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे, यावेळी मनसेचे मोहित हिवरकर, प्रमोद हणवते, बाळू गेडाम, उत्तम चिंचोलकर व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

डॉ. अब्दुल शेख हे अनेक वर्षांपासून वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती नसताना व आता सुद्धा त्यांची बदली झाली असतांना इथेच ते ड्युटी करत आहे व त्यांच्याकडे पीएम करण्याचे काम नसताना सुद्धा स्वतःच्या मर्जीने ते पीएम करतात, आतापर्यंत त्यांनी 300 पेक्षा जास्त पीएम केले आहे, जेंव्हा की नियमानुसार बिएचएमएस डॉ पीएम करू शकत नाही, असे असतांना तो नियम इथे पाळला जात नाही.

त्यामुळे वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार होतं नसल्याने इथे येणाऱ्या रुग्णांमध्ये असंतोष आहे. डॉ. अब्दुल शेख डॉक्टरवर यांच्यावर अनेक आरोप असून वरोरा पोलीस स्टेशनं येथे त्यांच्याविरोधात तक्रारी आहेत त्यामुळे शेख याची चौकशी करून निलंबानाची कार्यवाही करावी अन्यथा उपजिल्हा रुग्णालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे.