वन्य प्राणी नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा…शेतकरी नेते विनोद उमरे

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.27 नोव्हेंबर) :- या वर्षी अतिवृष्टीसारख्या आपतीजनक नैसर्गिक संकटातुन शेतकऱ्यांना जावे लागत आहे.दिवाळी झाली तरी अतिवृष्टी ची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळालीच नाही.शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते.याशिवाय शेतकऱ्यांना इतरही अन्य काही कारणांमुळे नुकसान सहन करावे लागते.जसे की वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते.

चिमूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची जमीन जंगला लगत नसल्यामुळे सभोवताल जंगल असल्यामुळे वन्य प्राणी रोही,डुक्कर, शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची नासधुस करतात.त्यात अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी काही तासातच उध्वस्त करत असतात.यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते.

परिणामी अशा शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असते. वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे. चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून दोन महिन्यापूर्वी नुकसान भरपाईची मागणी वनविभाग केली आहे.

तरीसुद्धा अजून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी वरिष्ठअधिकाऱ्यांनी चौकशी करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ नुकसान भरपाई जमा करण्यात यावी अशी शेतकरी नेते विनोद उमरे व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.