वनमजूर व अग्नि रक्षक यांची आढावा बैठक संपन्न

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.24 डिसेंबर) :- ताडोबा वनपरिक्षेत्र बफर कोअर विभागामध्ये जंगल लगत असलेले अनेक युवक प्रौढव्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून इथे वन विभागाच्या वनरक्षक यांच्या हाताखाली वन मजूर तसेच अग्नि रक्षक म्हणून काम करीत आहे परंतु या मजुरांना गेल्या अनेक दिवसापासून येथील वनरक्षक आपली मनमानी करून फक्त आणि फक्त पाच ते सहा महिने कामावर ठेवतात.

त्यानंतर आपल्या मनपसंतिने दुसरे कर्मचारी मजूर हाताशी धरून कामावर ठेवतात शिवाय वनमजूर यांना 24 तास कामावर ठेवतात व त्यांच्याकडून नको ते काम करून घेतात शिवाय त्यांना पगार हा कमी देऊन काही रक्कम काही वनरक्षक हडप करीत असल्याचा आरोप देखील वन मजुरांनी केला आहे शिवाय त्यांना आठ तास ऐवजी 24 तास सेवा करीत असल्याने त्यांना मिळेल ती रक्कम मासिक महिना मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे करिता वनमजुरांची सेवा फक्त आठ तास करून त्यांना मासिक महिन्यात वाढ देण्यात यावी यासोबत 24 तास सेवा देत असेल तर त्यांना किमान मासिक महिना पगार 24000 देण्यात यावा अशी मागणी आजच्या आढावा बैठकीत घेण्यात आली .

शिवाय यासोबत जंगलमध्ये अग्निरक्षक म्हणून काम करीत असलेल्या अग्नि रक्षक देखील यांना बाराही महिने काम द्यावे त्यांना देखील त्यांच्या सुरक्षितेकरिता त्यांना सूट बूट , ओळखपत्र, टॉर्च , अन्य सुख सोयी देण्यात यावी. व त्यांचा देखील पगार हा मासिक 24 हजार रुपये देण्यात यावा यासाठी प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री शेरखान पठाण व कामगार संघटना जिल्हाप्रमुख श्री आशिष रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन तात्काळ शासन दरबारी रेटा धरून पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.

या मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास काही दिवसातच आंदोलन देखील पुकारण्यात येईल अशी सुद्धा धमक देण्यात आली.. यावेळी प्रहार जनशक्ती वनमजूर अग्निरक्षक संघटना चे अध्यक्ष श्री शेरखान पठाण , सचिव श्री विजय आत्राम , उपाध्यक्ष श्री सुधाकर गायकवाड , श्री काशिनाथ चौधरी, गणेश खांडेकर व अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.