वनमजूर अग्निरक्षक यांच्या मागण्यासाठी बच्चु कडु यांना निवेदनातून साकडे

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.18 जुलै) :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अग्नि रक्षक व वन कामगार मजूर यांनी आपल्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्यात यासाठी माननीय नामदार बच्चू कडू साहेब माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्यात यासाठी येथील मजुरांनी निवेदनातून त्यांना आपल्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी निवेदनातून साकडे घातले . अग्नि रक्षक कर्मचाऱ्याला वेळेवर पगार देण्यात यावा तसेच त्यांना पाच महिन्याऐवजी बाराही महिने काम द्यावे तसेच त्याच्या संरक्षणाकरिता ड्रेस हेल्मेट थर्मास टॉर्च जूते व ओळखपत्र त्यांना देण्यात यावे.

तसेच काही अग्नीरक्षकाला दोन ते तीन महिनेच कामावर ठेवले जाते व वेळ संपल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकतात हा अन्याय बंद करावा. तसेच अग्नीरक्षक हा भर उन्हात तसेच अग्नीच्या तांडवमध्ये अग्नी भिजवण्याचे काम करतो त्यामुळे त्याच्या जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो त्यामुळे त्यांना विशेष विमा सुरक्षा कवच देण्यात यावे. काही वन कर्मचारी आपला मनमानी कारभार करून अग्नी रक्षकांचे पगार सुद्धा हडप करीत असल्याचा आरोप अग्नीरक्षक पथक यांनी केला आहे. तसेच अग्नीरक्षक हा गेल्या अनेक वर्षांपासून मोलमजुरीने वनविभागाची सेवा करीत आहे तरी देखील त्यांना गेल्या दहा वर्षापासून निधी भत्ता मिळालेला नाही तसेच त्यांना 24 तास ऐवजी फक्त आठ तास च काम द्यावे.

अग्नि रक्षक हा 24 तास काम करून देखील नियमाप्रमाणे असलेले 18 हजार 500 रुपये. ऐवजी 12500 रुपये त्यांच्या खात्यात जमा केली जाते व उर्वरित रक्कम वन अधिकारी हे स्वतः गडप करतात . तेव्हा त्यांची आर्थिक व शारीरिक मिळवणूक थांबवण्यात यावी व सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पाच ते सात तारखेपर्यंत त्यांचा मासिक पगार देण्यात यावा अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या वन मजूर तसेच अग्नीरक्षक मजूर यांनी नामदार बच्चुभाऊ कडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली आप भीती सांगून निवेदनातून आपल्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या याकरिता त्यांच्याकडे साकडे घातले.

प्रहार जनशक्ती पक्ष व अग्निरक्षक व वन कामगार मजूर कामगार संघटना चे संस्था अध्यक्ष तसेच प्रहार जनशक्ती पक्ष चे जिल्हाप्रमुख श्री शेरखान पठाण उपाध्यक्ष मधुकर गायकवाड संस्था सचिव श्री विजय आत्राम. सुधीर मेश्राम, अजय जुमडे, काशिनाथ चौधरी, संतोष देवतळे, वसंत भोयर, गजानन चौधरी, तुळशीराम कोयचाडे , गणेश खांडेकर, प्रशांत चौधरी इत्यादी कार्यकर्ते मजूर उपस्थित होते.