🔸वरोरा तालुका (उबाठा) शिवसेनेची मागणी, अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा
✒️मनोहर खिरटकर खाबांडा(Khambada प्रतिनिधि)
खांबाडा (दि.20 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील खांबाड़ा परीसरात विजेचा मोठा लंपडाव सुरु आहे. अगोदरच सोयाबीन उत्पादक शेतकन्याच्या हातात येणारे उभे पिक गेले बलीराजा संकटात सापडला आता दुसर्या पिकासाठी मशागत करून जमिन तयार करावी लागते मात्र लोडशेडींग सुरु आहे तो बंद करावा अन्यथा वरोरा तालुक्यातील शिवसेना (उबाठा) विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी खांबाडा येथील कार्यालयात दिलेल्या निवेदनातून दिला.
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचा विजेचा सारखा लपडाव सुरू आहे तो तात्काळ बंद करावा खांबाडा सह यातील म.रा.वि.वि. कंपनीच्या संबंधात असलेल्या सामान्य जनता व शेतकन्यांच्या समस्या ताबडतोब निकाली काढावा, अन्यथा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना स्टाईलने आदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना (उध्दव बालासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी दिला आहे.
उपरोक्त मागणीचे निवेदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) बरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच तालुका प्रमुख दत्ता बोरकर यांच्या संयोजनात उपतालुका प्रमुख सुधाकर बुराण याच्या नेतृत्वात खांबाडा उपविभागातील कंपनीचे कनिष्ठ अभियंत्या यांना नुकतेच दिले आहे. सदर निवेदनातअसे नमुद केले आहे की, सध्या पावसाळा संपत असल्यामुळे पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पाण्याअभावी शेत पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, परंतु विद्युत विभागामार्फत थ्री फेज पुरवठा हा रात्री करीत
असल्यामुळे शेत पिकांना ओलीत करणे कठीण जात आहे. त्यामुळे आठवडाभर दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, शेत पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बंद असलेल्या नादुरुस्ती कनेक्शनची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. पावसाळ्यात अतिरिक्त पावसामुळे शेतशिवारातील वाकलले विद्युत पोल आणि पडलेले म.रा.नि.वि.विद्युत पोल यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत
सदर पोल ताबडतोब सुरळीत करण्यात यावे. बोपापुर येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा नेहमीच खंडीत होत असतो. या ट्रान्सफॉर्मर वरील डी. ओ नेहमी पडत आहे.
याचा परिणाम म्हणून या परीसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असते.
या समस्येवर संबंधीत विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी पावसाळा संपल्यानंतर विद्युत विभागामार्फत विद्युत वायरवर आलेल्या झाडांची कटाई करावी. परंतु खाबाहा विभागात बऱ्याच ठिकाणी विद्युत वायर झाडाला स्पर्श करून असल्याचे दिसून येते. यामुळे येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतो, ज्या शेतकरी बाधवानी त्यांच्या शेतात विद्युत पुरवठा होण्यासाठी ए.जी. कनेक्शन डिमांड भरले आहे. या सर्व शेतकरी बांधवांना तसेच घरगुती विद्युत पुरवठा अर्ज केलेल्या नागरिकांना ताबडतोब विद्युत कनेक्शन पुरवण्यात यावे.
सदर निवेदन देत असताना उप तालुका प्रमुख सुधाकर बुराण, विभागीय समन्वय प्रमुख प्रमोद वाघ, शिवसेना विभाग संघटक नितीन मायकरकार, शिवसेना विभाग प्रमुख विनोद लोहकरे, शिवसेना विभाग समन्वयक अंकुश थाटे, सागर घोटे अरुण पोटे, बंडू धोटे, प्रमोद चौधरी.
आकाश जोगी, प्रमोद पाकमोडे, मारुती पोटे, पवन पोटे, संजय पोटे, गजानन तेजने, देविदास किनेकर, नानाजी गुडघाने अरविंद ठाकरे, आशिष गोहणे, मोरेश्वर ठाकरे, विकास कोसरे, प्रशांत मेश्राम, शिवाजी पधंरे, नामदेव सोयाम, ऋतिक आत्राम, संतोष आडकिने, खुशाल लडके आणि विठ्ठल बोरेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.