लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे यांच्या स्मृति सोहळ्यानिमित्त वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन 

🔸कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आयोजकाकडून आवाहन

✒️वरोरा.(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.14 सप्टेंबर) :- महाराष्ट्राचे कर्तुत्ववान मार्गदर्शक लोकनेते स्वर्गवासी दादासाहेब देवतळे यांच्या 38 व्या स्मृती सोहळ्यानिमित्त्याने वरोरा येथील स्वर्गवासी दादासाहेब देवतळे शेतकरी भवन वरोरा येथे उद्या दिनांक 15 सप्टेंबर रविवारला दुपारी 12 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमाचे निमित्याने उद्या सकाळी 8 ते 9 वाजता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम त्यानंतर 9 ते 11 या दरम्यान रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले याकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या वैद्यकीय पथक यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत.

त्यानंतर 11 ते 12 या दरम्यान शेतकऱ्यांसाठी शेतकरी मार्गदर्शन मेळावा, दुपारी 1 वाजता श्रद्धांजलीपर कार्यक्रम अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमाने लोकनेते स्वर्गवासी दादासाहेब देवतळे यांचा स्मृती सोहळा संपन्न होत आहे याकरिता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान.श्री.प्रा. ज्ञानेश जी वाकुडकर ज्येष्ठ साहित्यिक नागपूर. विशेष अतिथी म्हणून मान. श्री . विकासजी शिरपूरकर सेवानिवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय.,तसेच मान.श्री . संतोषसिंहजी रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत .

करिता होणाऱ्या कार्यक्रमाला परिसरातील सर्व जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. विजय देवतळे अध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा,तथा समस्त संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.