रिषभ रठ्ठे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.30 डिसेंबर) :- टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष रिषभ रठ्ठे यांच्या (३१डिसेंबर) रोजी वाढदिवसानिमित्त वरोरा येथील अंबादेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमाचे व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टायगर ग्रुप च्या माध्यमातून रिषभ रठ्ठे व त्यांचा मित्र परिवार चमू तालुक्यात समाजोपयोगी विविध उपक्रम राबवत असतात, याचाच एक भाग म्हणून टायगर गृपच्या माध्यमातून रिषभ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वरोरा येथील अंबादेवी मंदिराच्या आवारात आरोग्य निदान शिबिर येस हाॅस्पीटल नागपूर, व भव्य रक्तदान शिबीर रेन्बो ब्लड बँक व काॅंपोनेंट सेंटर नागपूर याची टिम तपासणी साठी उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाला वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्कारमुर्ती करण संजय देवतळे हे उपस्थित राहणार आहे, तसेच टायगर गृप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै तानाजी जाधव, टायगर गृप संस्थापक अध्यक्ष पै जालिंदर जाधव व आलेख रठ्ठे अध्यक्ष जय अंबे शारदा माँ उत्सव मंडळ वरोरा, तसेच वरोरा शहरातील पञकार, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे,या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन वरोरा तालुका टायगर गृप च्या वतीने करण्यात आले आहे.