रिषभ रठ्ठे यांचा वाढदिवस रक्तदान व आरोग्य शिबिराचे उपक्रमाने साजरा

🔹भारत मातेचे सुपुत्र शहीद अक्षय निकुरे यांना श्रद्धांजली अर्पण 

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.2 जानेवारी) :- महाराष्ट्र टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष रिषभ रठ्ठे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवुन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.वाढदिवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन वरोरा येथील अंबादेवी वार्डातील अंबादेवी मंदिरामध्ये करण्यात आले होते .

एकूण 49 युवकांनी रक्तदान केले तर 102 लोकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये तरुण युवकांसह, वयोवृद्ध महिला व पुरुषांनी लाभ घेतला.नागपूर येथील येस हॉस्पिटल नागपूर व रेनबो ब्लड व कंपोनेंट सेंटर नागपूर यांची चमू नर्स व डॉक्टर यांनी मुलाचे सहकार्य केले .

नुकतेच जम्मू काश्मीर मध्ये भारतीय सैन्याचे जवान अक्षय निकुरे हे शहिद झाले,विर शहीद जवान अक्षय यांचे आईवडील यांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमात शहीद अक्षय निकुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, उपस्थित लोकांना मसाला भात वाटप करण्यात आले,अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व रिषभ रट्टे यांच्या उपक्रमांची प्रसंशा केली.

व त्यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिला या कार्यक्रमाला वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार करण संजय देवतळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टायगर ग्रुपच्या पदाधिकार्यांनी मोलाचे योगदान दिले.